Logo
  Be cool. I am processing your request...

   25 Apr 2020 , 09:28 pm




माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ नागपूर तर्फे माळी समाजातील गरजूं परिवरांना धान्य वितरण

नागपूर प्रतिनिधी:

कोरोना महामारीच्या अनुषंगाने घोषित केलेल्या लॉकडाऊन मुळे माळी समाजातील हातावर पोट असलेल्या कामगार वर्गाची उपासमार होऊ नये याकरिता पुढाकार घेऊन माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ नागपूर तर्फे धान्य वितरणाची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. आज पर्यंत दक्षिण नागपूर, पूर्व नागपूर, दक्षिण पश्चिम नागपूर, मध्य नागपूर , पश्चिम नागपूर या भागातील ११० ते ११५ परिवारांना धान्य वितरित करण्यात आले आहे. 

सध्याची परिस्थिती पाहता कोणतीही बिझनेस चर्चा न करता सामाजिक कार्यात लक्ष देणे गरजेचे आहे त्या मुळे  सोशल मीडिया वर ची उद्योग विषयक चर्चा माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ तर्फे थांबवण्यात आली आहे. 

मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्षेत्रातील माळी समाज बांधव रोजगाराच्या निमित्ताने आले आहेत. छोटी मोठी नोकरी करून, छोटा मोठा व्यवसाय करून किंवा मोलमजुरी करून यांचा उदर निर्वाह चालतो. लॉकडाऊन मुळे या समाजबांधवांच्या हाताला काही काम नाही या गरजू समाजबांधवांची उपासमार होऊ नये या करिता आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या समाज बांधवांनी पुढे येऊन आपल्या  आपल्या शहरातील गरजूं माळी समाज बांधवांना मदत कारवी तसेच माळी समाजातील उद्योजकांनी कोविड १९ च्या या कालावधीत कोणतेही बिझनेस प्लॅनिंग करू नये किंवा कुठेही गुंतवणूक करू नये ,शेअर मार्केट मध्ये तर अजिबात गुंतवणूक करू नये कारण कोण जाणे येणाऱ्या काळात कोणत्या कंपनी भारतात राहतील किंवा कोणत्या कंपनी कोणाच्या ताब्यात जातील याची काही शास्वती नाही. येणाऱ्या परिस्थिती नुसार सरकार आणि रिझर्व्ह बँक जे धोरण ठरवतील त्या नुसारच बिझनेस प्लॅनिंग करावे. कोविड १९ नंतरचा काळ कोणत्या औद्योगिक क्षेत्राला पूरक राहील त्या बद्दल संपूर्ण उद्योग क्षेत्र साशंक आहे त्यामुळे संयम ठेवा चौक्या सल्ल्यांपासून दूर राहा घरी राहा सुरक्षित रहा असे आवाहन श्री.अविनाश ठाकरे यांनी केले आहे.