Logo
  Be cool. I am processing your request...

  Opinions

Mr. Nitin Gadkari
Minister of Road Transport and Highways of India

सर्वप्रथम मी मा. अविनाश जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच मनापासून अभिनंदन करतो कि त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याकरता या उपक्रमाची सुरुवात केली. आपल्या देशामध्ये नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे बनणे हि देशाची गरज आहे आणि देशामध्ये निश्चितपणे क्षमता आहे कि आपण लाखो लोकांना रोजगार देऊ शकतो आणि हे वातावरण निश्चितपणे या फोरम च्या उपक्रमातून निर्माण होईल आणि लोकांना प्रेरणा मिळेल असा मला विस्वास आहे. जे काही वातावरण या फोरम च्या माध्यमातून निर्माण झालं आहे ते समाजाच्या विकासाच्या भविष्याला दिशा देणार आहे. मी मनापासून या उपक्रमाला शुभेच्छा देतो.


Mr. Devendra Fadnavis
Chief Minister of Maharashtra

मी आपल्या सर्वांच अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो कि आपण अतिशय उत्तम उपक्रम चालू केला. समाजामध्ये जे वेगवेगळे काम करणारे घटक आहेत त्या घटकांचं या माध्यमातून त्यांच्या कार्याचं फक्त प्रदर्शन नाही तर त्यातन एक चांगल संघटन देखील यानिमित्ताने होत आहे आणि त्यासोबत समाजात कार्यरत अशा सगळ्या यशस्वी लोकांना पाहिल्या नंतर, त्याचं कार्य पाहिल्यानंतर, त्याचं मार्गदर्शन घेतल्यानंतर निश्चितपणे सर्वांना प्रेरणा मिळते आणि म्हणून या उपक्रमाच मी अभिनंदन करतो. या आपल्या फोरमला जे काही सहकार्य राज्य सरकार ला करता येईल ते राज्य सरकार निश्चितपणे करेल आणि उद्योजकता सुरु करण्याच्या दृष्टीने, उद्योजक तयार करण्याच्या दृष्टीने मी अविनाशजींना अशी विनंती करेल कि आपण स्कील डेव्हलपमेंटचे प्रोग्राम या फोरम च्या माध्यमातून घेता आले तर निश्चितपणे घ्यावे. त्यातही राज्य सरकार आपल्या पाठीशी उभं राहील आणि सरकार चा जो स्कील डेव्हलपमेंट विभाग आहे तो आपल्या फोरम सोबत काम करेल. एक अतिशय चागला उपक्रम आपण हाती घेतला त्याबद्दल आपले अभिनंदन.


Mr. Chandrashekhar Bawankule
Minister for Ministry of Energy, New and Renewable Energy MH. Guardian Minister, Nagpur

समाजामध्ये सर्व स्तरावरच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तीला रोजगार मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे असा विचार घेऊन अविनाश ठाकरे व केजेफोसीआ फोरम आलं आहे. महात्मा फुलेंच्या विचाराचा देश निर्माण झाला पाहिजे, राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, समाज निर्माण झाला पाहिजे, महात्मा फुलेंचा विचार जगामध्ये माणूस निर्माण करू शकतो त्यामुळे हा विचार फक्त माळी समजासाठी मर्यादित नसून जगतव्यापी आहे. अशा थोर व्यक्तीमत्वाचे विचार घेऊन मा. अविनाश जी आणि त्यांची टिम आली, मी त्याचं कौतुक करतो. पक्षाच्या सीमेबाहेर विचार करून समाजाचं भल कसं करता येईल असे विचार करणारे नेतृव जिथ असत त्या समाजाला उन्नतीपासून कुणीच थांबवू शकत नाही. हे जे कार्य सुरु केलंय हि काळाची गरज आहे, समाज राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सशक्त झालाच पाहिजे आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत झाल्याशिवाय बाकी गोष्टीत तो मजबूत होत नाही. या फोरम च्या माध्यमातून आपण समाजाला मजबूत कराल, आमची सर्वांची साथ आपणाला आहेच, मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.