Logo
  Be cool. I am processing your request...

   15 Mar 2020 , 07:38 pm




माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ ची मोठी घोषणा :: माळी समाजातील छोट्या मोठ्या सर्व व्यावसायिकांना उपलब्ध करून देणार निशुल्क ऑनलाईन मार्केटिंग पोर्टल चा प्लॅटफॉर्म :: सर्व व्यावसायिकांचे तयार करुन देणार वैयक्तिक वेब पेज :: खर्चाची जबाबदारी केजेफोसिआ स्वीकारणार.

केजेफोसिआ प्रतिनिधी :

तीन आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यामुळे माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ ने आता आपल्या कामाची गती वाढवली आहे. मागील आठवड्यात "केजेफॉसीआ" चे  सभासदत्व निशुल्क देण्याच्या घोषणे नंतर आता माळी समाजातील सर्व छोटे  मोठे  व्यापारी ज्यामध्ये किराणा,फळ भाजी,क्लाॅथ सेंटर, होजीअरी, फुट वेअर, स्टेशनरी, औषधी, ईलेक्ट्रीकल, ईलेक्ट्राॅनीक्स, मोबाईल, होम अप्लायनसेस, फर्निचर, गिफ्ट आयटम, स्टेनलेस स्टिल, क्राॅकरी, शाॅपींग माॅल, बिल्डींग मटेरीअल, प्लास्टिक आयटम, कंम्प्युटर सप्लाय,कृषी केंद्र, दुध डेअरी, बेकरी असे आणि या शिवाय कोणतेही दुकान असेलेले सर्व दुकानदार ,वकील, डाॅक्टर, टॅक्स कन्सलटंट, ईंन्श्युरंस एजंट, पिग्मी एजंट,आर्कीटेक्ट,स्ट्रक्चरल डिझायनर, ईंटेरीअर डिझायनर,लॅंड डेव्हलपर, बील्डर, सीव्हिल काॅंट्रक्टर, फॅब्रीकेटर, ईलेक्ट्रीकल काॅंट्रॅक्टर, ईलेक्ट्रीशीअन, प्लंबर,पेंटर, ड्रेस डिझायनर, ब्युटी पार्लर,कोचींग क्लास,म्युझीक क्लास, स्पोर्टस ॲकॅडमी, डीजीटल प्रिंटर, डीटीपी ॲापरेटर, मोटार गॅरेज, कार सर्विसींग, ईलेक्ट्राॅनिक रीपेअरींग, आयटी सोल्युशन, ई सेवा केंद्र, अश्या प्रकारच्या आणि याशिवाय ईतर सेवा देणारे प्रोफेशनल, मॅनुफॅक्चरिंग करणारे सर्व उद्योजक, गृह उद्योजक, फार्मर प्रोड्युसिंग कंपनी , बचत गट, हॉटेल , रेस्टारंट, खानावळ, पेट्रोल पंप, शिक्षण संस्था, पत संस्था  चालवणारे  अशा सर्वांसाठी  "AMAZON " ,"FLIPK ART", "SNAPDEAL", "MYNTRA ", "PROPERTYWALA", "POLICYBAZAR ","PAISABAJAR " प्रमाणे स्वतःचे "ON LINE PORTAL"  उपलब्ध करून देणार सोबतच सर्व व्यापाऱ्याचे स्वतःचे वेब पेज देखील निशुल्क बनून देणार अशी मोठी घोषणा माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ फोरम चे चेअरमन मा. अविनाश ठाकरे यांनी नागपूर येथील "केजेफोसिआ" आणि "माळी महासंघ" द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय पदाधिकारी बैठकीत केली. या संपूर्ण प्रकल्पाला लाखो रुपयांचा खर्च लागणार असुन या संपूर्ण खर्चाची जबाबदारी माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ उचलणार आहे. ठाकरे म्हणाले कि अनेकांना हे वाटू शकते माळी समाजाच्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन मार्केट पोर्टल चा काय फायदा होईल. परंतु तहान लागल्यावर विहीर खोदायची नसते. माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ स्थापनेपासूनच भविष्याचा वेध घेत कार्य करीत आले आहे. एक दशकापूर्वी ज्या ऑनलाईन मार्केट कंपन्यांची सुरवात झाली त्या हळु हळु सर्व क्षेत्रात आपले हातपाय पसरऊ  लागल्या आहेत. याचा फटका शहरी भागातल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना बसायला लागला आहे. या कंपन्यांना ग्रामीण भागात शिरायला देखील वेळ लागणार नाही. माळी समाजातील व्यापाऱ्यांना नुकसान पोहोचायच्या अगोदरच हि व्यवस्था उभी होणे आवश्यक आहे. माळी समाजातील सर्व व्यापारी एकाच प्लॅटफॉर्म वर आले तर बेरोजगार तरुणांना सुद्धा घरी बसल्या व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

गेल्या आठवड्यात माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ तर्फे निशुल्क सभासद योजनेची घोषणा झाल्यापासून रोज शेकडो अर्ज प्राप्त होत आहे. परंतु बऱ्याच व्यापाऱ्यांना ऑनलाईन अर्जाची सवय नसल्याने अर्जात बऱ्याच त्रुटी राहत आहे. या त्रुटी दुरुस्त करून मंजुरी द्यावी लागत असल्याने वेळ लागत आहे. तरी माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी ४ दिवसात दिवस रात्र काम करून ११० ते १२० अर्ज मंजूर करून सभासदत्व बहाल केले. हे सर्व अर्ज सोशल मीडिया तुन होणाऱ्या प्रचारा च्या माध्यमातून भरल्या जात आहे. अजूनही बराच मोठा वर्ग असा आहे ज्यांच्या पर्यंत हि माहिती पोचली नाही. या सर्व बाबी तंत्र ज्ञानाशी निगडित असल्याने आता येत असलेल्या आणि पुढे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन माळी महासंघ पदाधिकारी  आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांची मदत घेण्याचे ठरविण्यात आले. ज्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल . या  कार्यकर्त्यांना  कामाचा मोबदला म्हणून माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ तर्फे मानधन देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.  ज्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते नसतील त्या ठिकाणी मार्केटिंग एक्सीक्युटीव्ह अँपॉईंट करून व्यापाऱ्यांना ऑनलाईन मार्केट पोर्टल उपलब्द करून देण्यात येईल. या सर्व योजनेचा  लाभ घ्यायचा असल्यास पहिले व्यापाऱ्यांना माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ चे सभासद बनणे अनिवार्य आहे अशी माहिती मा. अविनाश ठाकरे यांनी दिली. 

या बैठकीच्या यशस्वीतेकरिता माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ सचिव मा.रवींद्र अंबाडकर यांनी विशेष प्रयत्न केले.  बैठकीला माळी महासंघ विश्वस्त श्री. अरुण तिखे, उद्योजिका वंदना अकर्ते , उद्योजक सुधाकर कणिरे ,उद्योजक दीपक येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. केजेफोसिआ डायरेक्टर श्री नंदकिशोर कन्हेरे, विश्वास महादुरे,श्री. संजय बोबडे, श्री. ज्ञानेश्वर लोखंडे, श्री. प्रकाश बोबडे,श्री. सुरेंद्र अंबाडकर, केजेफोसिआ पश्चिम विदर्भ  विभाग चेअरमन प्रा. संजय बोरोडे,माळी महासंघ पश्चिम विदर्भ विभाग अध्यक्ष मा. राजेश जावरकर,केजेफोसिआ पश्चिम विदर्भ  विभाग व्हाईस चेअरमन श्री विक्रांत इंगळे, केजेफोसिआ तथा माळी महासंघ चे विदर्भातील सर्व जिल्हा पदाधिकारी व केजेफोसिआ चे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन केजेफोसिआ नागपूर चॅप्टर सेक्रेटरी श्री विनीत गणोरकर यांनी केले आणि केजेफोसिआ नागपूर चॅप्टर चेअरमन श्री राहुल पलाडे  यांनी आभार मानले.