अहमदनगर च्या उद्योजकांची नागपूर ला माळी उद्योजक फोरम सोबत बैठक व चर्चा सत्र
समाजाच्या आर्थिक प्रबळतेकरीता माळी उद्योजक फोरम अर्थात क्रांतिसूर्य जोतीराव फुले फोरम ऑफ सोसिओ कमर्शिअल ऐंड इंडस्ट्रीअल एक्टीव्हिटी गेल्या दीड वर्षापासून कार्यरत आहे व अनेक उद्योजक फोरम सोबत जुळले आहेत. फोरम नवनवीन उद्योगाच्या संधी, सरकारी कामाची माहिती व टेंडर ची माहिती इमेल, मेसेज, सोशल मेडिया द्वारे सभासदांना देत आहे.
दि. ५ सप्टेंबर ला अहमदनगर वरून काही माळी उद्योजक फोरम च्या कार्यबद्दल आवर्जून जाणून घेण्यासाठी व उद्योगाच्या नवीन संधी काय आहेत यावर चर्चा करण्यासाठी आले होते. नामदेव खेतमाळी, शहाजी हिरवे, गुलाब बोडखे, सोनदेव बोडखे, गणेश हिरवे, राजू खेडेकर, अर्जुन लोंढे या नगरकर उद्योजकांची उपस्थिती होती, तसेच राष्ट्रीय डायरेक्टर मा. रवींद्र आंबाडकर, राष्ट्रीय डायरेक्टर मा. सुरेंद्र आंबाडकर व केजेफोसिआ मेंबर श्री परमेश्वर मेहेत्रे (सोशल मेडिया मार्केटर व वेबसाईट डिझाईनर) यांची सुद्धा उपस्थिती होती, दरम्यान फोरम चे चेअरमन मा. अविनाशभाऊ ठाकरे यांनी सर्वांना सखोल माहिती दिली कि फोरम चा उद्देश काय आहे, फोरम कशा प्रकारे काम करत आहे, सभासदांना काय फायदे आहे, सभासद होण का गरजेच आहे, सामाजिक बांधिलकी कशी जपत आहोत, येणाऱ्या काळात काय योजना आहे, नवीन टेंडर ची माहिती कशी गोळा केली जाते - कशी पुरवली जाते, इतर समाजातील कामे मेंबर ला कशी दिली जातात, मेंबर च्या व्यवसाय वाढविण्यासाठी फोरम कशी मदत करते या सर्व गोष्टींवर सखोल माहिती दिली गेली.
समाजाच्या सद्य परिस्तिथी काय आहे, काय करायला पाहिजे व समाजातील उद्योजकांना, समाज बांधवांना माळी उद्योजक फोरम कडून काय अपेक्षा आहे हे अहमदनगर वरून आलेल्या उद्योजकांनी अगदी मनमोकळेपणाने बोलून दाखवलं. दिलखुलास चर्चा केली गेली व उद्योगीक संधी, उद्योजक निर्मिती, समाज आर्थिकदृष्ट्या प्रबळ करणे, रोजगार निर्मिती या व अशा काही मुद्देसूद उद्देशांसोबत बैठक पार पडली.