आधुनीक तंत्रज्ञानाद्वारे शेतीतील ऊत्पादकता वाढविण्याकरीता देशातील तज्ञ चमु सोबत करार करण्यासंबंधी केजेफोसीआ तर्फे सुरवात, प्रारंभीक चर्चा संपंन्न
एच एस बी सी बॅंकचे माजी ऊपाधक्ष श्री श्रीराम सींग ज्यांचे हल्ली सात थर शेती (Seven Layer Farming) या तंत्रज्ञानावर आधारीत शेती च्या माध्यमातुन शेतीची ऊत्पादकता वाढऊन ऊत्पादीत शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ऊपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे, काल केजेफोसीआ चे चेअरमन श्री अविनाशभाऊ ठाकरे व सचीव श्री रवींद्र अंबाडकर यांनी श्री श्रीराम सींग यांचे सोबत भेट घेतली व माळी समाजातील शेतक-यांना प्रगत शेती तंत्रज्ञानाची माहीती मिळावी, शेतीची ऊत्पादकता वाढावी , काॅंट्रॅक्ट फारमींग, शेतमालाचे ग्रेडेशन अशा विविध विषयावर कार्यशाळा घेण्यासंबंधी चर्चा केली. व नजीकच्या काळात माळी समाजातील शेतक-यांच्या कार्यशाळा कशाप्रकारे घेण्यात येतील याचा प्रारूप आराखडा तयार केला. लवकरच श्री सींग यांच्या कंपनी सोबत करार करून माळी समाजातील शेतक-यांच्या शेतातील ऊत्पादकता वाढण्याकरीता करीता केजीफोसाआ तर्फे जिल्ह्याच्या ठीकाणी कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार आहेत. या बैठकीमधे प्रसीध्द ऊद्योगपती श्री पंड्या व केजेफोसीआ डायरेक्टर श्री सुरेंद्र अंबाडकर देखील ऊपस्थित होते.
टीम केजेफोसीआ