समाज बांधवांच्या प्रचंड प्रतिसादात केजेफोसीआ आयोजित माळी उद्योजक सुमीट अहमदनगर येथे संपन्न
माळी समाजातील उद्योजकांना एकत्र करून समाजाला नवी दिशा देणारी, समाजाला व समाजातील उद्योजकांना प्रबळता प्रदान करणारी संस्था केजेफोसीआ (माळी उद्योजक फोरम) अहमदनगर द्वारा मा. अविनाश भाऊ ठाकरे (केजेफोसीआ चेअरमन) यांच्या अध्यक्षतेमध्ये व अहमदनगर रीजन हेड मा. शंकरराव नेवासे यांच्या नियोजनात माळी उद्योजक बिझनेस सुमीट दि. २४ सप्टेंबर, २०१७ ला समाज बांधवांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली. बैठक तीन सत्रांमध्ये विभाजित करण्यात आली होती.
१) केजेफोसीआ संकल्पना व प्रस्तावना
२) चर्चा सत्र (प्रश्न-उत्तर सत्र)
३) उद्योग निर्मिती मार्गदर्शन सत्र
या बिझनेस सुमीट चं आयोजन केजेफ़ोसीआ (क्रांतिसूर्य जोतीराव फुले फोरम ऑफ सोशीयो कमर्शिअल अॅन्ड इंडस्ट्रियल असोसिएशन), माळी उद्योजक फोरम अहमदनगर द्वारा मा. श्री. शंकरराव नेवासे यांच्या नियोजनात व केजेफोसीआ चेअरमन मा. अविनाश भाऊ ठाकरे यांच्या अध्यक्षेतेखाली करण्यात आलं होत. पहिल्या सत्रामध्ये मा. आ. पांडुरंगजी अभंग यांच्या अध्यक्षेतेमध्ये केजेफोसिआ काय आहे, केजेफोसीआ ची संकल्पना काय आहे, ध्येय-धोरण काय आहे अशी सगळी माहिती समाज बांधवांना देण्यात आली. सत्र दुसरे, मा. अभय जी आगरकर यांच्या अध्यक्षतेमधे घेण्यात आले व यामध्ये व्यवसाय कसा करावा, व्यवसाय वृद्धीसाठी काय करावं व समाज बांधवांच्या प्रश्नांचं समाधान करण्यात आलं. तिसऱ्या सत्रामध्ये उद्योग निर्मिती कशी करावी, त्यासाठी काय उपाय योजना केल्या पाहिजे, कशा मशिनरी असतात, त्या कशा घ्याव्या, व्यवसाय रजिस्ट्रेशन कसं करावं यावर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रासाठी मा. भगवानराव फुलसौदर (प्रथम माजी. महापौर) हे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाच आयोजन हॉटेल राज पॅलेस, टिळक रोड, अहमदनगर येथे करण्यात आलं होत, ३०० व्यवसायिक बसतील अशी हॉल ची व्यवस्था असताना अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला व त्यामुळे २०० ते २५० व्यासायिक समाज बांधवांना उभं राहून व काही जणांना हॉल च्या बाहेरून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा लागला. प्रसंगी आपणास मा. कडूभाऊ काळे (चेअरमन नागेबाबा पतसंस्था), मा. समीर ससाणे (श्रीरामपूर), मा. धनंजय जाधव (संचालक बंधन लॉन), मा. नंदूशेट एकाडे (राज पॅलेस), मा. दत्ता शेट जाधव, सौ. सुवर्णाताई जाधव (सभापती, स्थायी समिती, नगर), मा. दत्ताशेट गाडळकर, मा. मचींद्र गुलदगड, मा. संभाजीराजे अनारसे, मा. आंबादासजी गारुडकर, मा. मधुकर शिंदे (उद्योगपती), मा. निलेश चिपाडे, डॉ. एकचंद अनारसे, मा. बंडूशेट एकाडे, मा. राजूशेट एकाडे, डॉ. योगेश चिपाडे, मा. राहुल सोनमाळी, मा. अमोल सोनमाळी, मा. संजय चाफे, मा. बाळासाहेब ताजने, मा. धीरज गायकवाड तसेच मा. रवींद्र आंबडकर (नेशनल सेक्रेटरी), मा. प्रदीप राऊत (औरंगाबाद रिजन हेड), मा. राजू जाधव (पुणे रिजन हेड), मा. संजय बोबडे (रिटेलर विंग हेड), मा. प्रकाश बोबडे (युथ विंग हेड) सोबतच नासिक, बीड, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, नागपूर, अहमदनगर व इतर जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे प्रचंड उत्साहात व माळी उद्योकांच्या उस्पुर्त प्रतिसादात नगर ची बिझनेस मिट संपन्न झाली.
येत्या २७-२८-२९ नोव्हेंबर, २०१७ ला नासिक चाप्टर ने, उद्योजक मेळावा घेण्याची मागणी केली असून त्यांच्या या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली व प्रसंगी नासिक च्या टिम चा, मा. अनिल नाले, मा. नितीन शेलार, मा. अरुण थोरात, मा. संतोष पुंड, मा. विवेक सोनावणे यांचा माळी उद्योजक क्रांती मेळावा ची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल सत्कार करण्यात आला व या वर्षी चा माळी उद्योजक क्रांती मेळावा नासिक येथे होणार आहे अशी जाहीर माहिती देण्यात आली.
फोटो खालील लींक वर पहा: http://kjffoscia.org/gallery/photoShow/11