"केजेफोसीआ" तर्फे आयोजीत ऊद्योजक क्रांती २०१७ राज्यस्तरीय माळी समाज ऊद्योजक प्रदर्शनी व मेळावा यंदा नाशीक मधे
दरवर्षी प्रमाणे यंदाही माळी समाजाच्या ऊद्योजकांचे व व्यावसायीकांच्या मालाचे प्रदर्शनी यंदा नाशीक विभागातील नाशीक शहरात भरविण्यात येणार आहे. २०१५ व २०१६ मधे हे प्रदर्शन नागपूर येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनी चे ऊदघाटन खासदार राजीव सातव व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते तसेच समारोप राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे हस्ते करण्यात आला होता. दोनही वर्षी माळी समीजातील शेकडो ऊद्योजकांनी व व्यावसायीकांनी आपले स्टॉल लाऊन प्रदर्शनीचा लाभ घेतला व किमान २५ ते ३० हजार समाजबांधवांनी या प्रदर्शनाला भेट देऊन मालाची खरेदी केली. दोनही प्रदर्शनी मधे सहभागी झालेल्या ऊद्योजकांना व व्यावसायीकांना मोठ्या प्रमाणात समाजाची बाजारपेठ या प्रदर्शनी च्या माध्यमातुन ऊपलब्ध झाली आहे.
नुकत्याच अहमदनगर येथील बिझनेस सुमीट मधे केजेफोसीआ नासीक चाप्टर तर्फे यंदाची प्रदर्शनी नाशीक येथे भरविण्यात यावी असा प्रस्ताव दिला व त्याला नँशनल गव्हर्नींग बोर्ड तर्फे मान्यता देण्यात आली.
दिनांक २६, २७, २८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ही प्रदर्शनी भरविण्यात येणार आहे व किमान २५० ते ३०० ऊद्योजकाना व व्यावसायीकांना स्टाँल देण्यात येईल अशी माहीती आयोजन समीतीचे प्रमुख व नासीक चाप्टर चे डायरेक्टर श्री अनील नाले, श्री अरूण थोरात, श्री ऩितीन शेलार, श्री विवेक सोनवणे, श्री संतोष पुंड व श्री स्वप्निल फुले यांनी दिली.
दि.२६ ला सकाळी १० वाजता ऊदघाटन, दि. २८ ला सायं ६ वा. समारोप व दि. २७ ला माळी समाजातील कलावंताना संधी मिळावी म्हणुन सांस्कृतिक कलामहोत्सव अशाप्रकारे आयोजन ठरविण्यात आले आहे अशी माहीती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे. जास्तीत जास्त समाजबांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा व स्टॉल बुकींग तसेच ईतर माहीती करीता
श्री विवेक सोनवणे 8857955554,
श्री संतोष पुंड 9860634947,
श्री स्वप्नील फुले 9766012777
यांचे सोबत संपर्क करावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
माळी उद्योजक मेळावा २०१५ व २०१६ चे फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: http://kjffoscia.org/gallery/photoShow/1