Logo
  Be cool. I am processing your request...

   15 Oct 2017 , 09:25 pm




अमरावतीकरांचा माळी उद्योजक फोरम (केजेफोसिआ) च्या बैठकीला उत्स्पुर्द प्रतिसाद

दि. १३, ऑक्टोंबर ला संपन्न झालेल्या अमरावती येथील माळी उद्योजकांच्या मिटिंग ला अमरावतीकरांनी प्रंचड प्रतिसाद दिला. केजेफोसिआ चेअरमन मा. श्री. अविनाश भाऊ ठाकरे यांच्या उपस्थितीत व महात्मा फुले अर्बन को.-ऑप. बँक. लि. अमरावती चे चेअरमन मा. श्री. राजेंद्र आंडे यांच्या नेतृत्वात व मा. संजयजी बोराडे यांच्या संचालनात हि मिटिंग संपन्न झाली.

अनेक माळी उद्योजकांनी लगेच मेंबरशीप घेतली व काही उद्योजकांनी फॉर्म भरून दिले. अतिशय उत्स्पुर्थ प्रतिसाद माळी उद्योजकांनी दिला व याच कारण हे आहे कि तत्पूर्वी केजेफोसीआ या आपल्या माळी उद्योजक फोरम चे उद्देश, ध्येय, धोरण व संकल्पना सर्वांना सांगण्यात आली. कंपनीकडे कशा प्रकारची योजना आहे जेणेकरून तुमचा व्यवसाय वाढेल व कशाप्रकारे कंपनी तुमच्या व्यावासायची मार्केटिंग करून देते तसेच कंपनी सोबत जुळलेल्या कुटुंबांच रेडी मार्केट तुम्हाला कसं उपलब्ध आहे हे सांगण्यात आलं. मेंबर ला कशाप्रकारे या फोरम चे फायदे आहे व मेंबरशीप का फायद्याची आहे हे मा. चेअरमन अविनाश भाऊ यांनी सांगितल्यावर सर्वांच्या शंका-कुशंका दूर झाल्या व सर्वांनी केजेफोसीआ सोबत जुळण्याची तयारी दर्शवली त्यापैकी बऱ्याच जनांनी तात्काळ फॉर्म भरून दिले व २१ उद्योजकांनी लाइफ मेंबरशीप स्विकारली.

कार्यक्रमाला केजेफोसीआ चे नेशनल सेक्रेटरी मा. रवींद्र अंबाडकर व डायरेक्टर मा. संजय बोबडे, मा. प्रकाश बोबडे, मा. विनीत गणोरकर सोबतच अमरावती मधून माळी उद्योजक उपस्थिती होते.