भोपाळ, बारामती व चंद्रपूर तसेच नागपूर सोबत नागपूरइतर सर्व जिल्ह्यातून व्यवसाय व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेला माळी समाज बांधवांची हजेरी
केजेफोसीआ आयोजित व्यवसाय व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेला दि १५, ऑक्टोबर २०१७ ला समाज बांधवांनी विविध जिल्ह्यातून प्रतिसाद दिला व उपस्थिती दर्शवली. कंपनी चे चेअरमन मा. अविनाश भाऊ ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित व प्रमुख व्यक्ते मा. अनिल ओंकार सर यांच्या ट्रेनिंग सेशन ने कार्यक्रमात प्राण ओतले.
व्यवसाय व व्यक्तिमत्त्व विकास या विषयवार मा. अनिल ओंकार सर यांनी सर्व उद्योजकांना उपयोगी पडेल अस मार्गदर्शन केलं व कंपनी चे चेअरमन मा अविनाश भाऊ ठाकरे यांनी कंपनी चा मागील वर्षीचा आढावा मांडत हे स्पष्ट केलं कि कंपनी मेंबर च्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी सक्षम व बांधील आहे व आपण सर्वांनी कंपनीच्या रिसोर्सेस चा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. प्रसंगी सर्वांच्या उपस्थितीत मेंबर च्या काही कॉस्मेटिक ब्युटी प्रॉडक्ट च उदघाटन सुद्धा करण्यात आलं.
कार्यक्रमास नॅशनल सेक्रेटरी- श्री रवींद् आंबडकर, श्री सुरेन्द्र आंबडकर, नॅशनल डायरेक्टर श्री अरुण पवार, श्री नाना लोखंडे, श्री नंदुजी कन्हेर, श्री प्रकाश बोबडे, श्री संजय बोबडे, लक्ष्मी बुजाडे नागपूर चाप्टर चे कोषाध्यक्ष श्री मिलिंद भौंगाडे , जॉइंट सेक्रेटरी ऍड. नितीनजी देशमुख, व्हॉईस चेअरमन श्री प्रदीप दहिकर तसेच श्री गिरीश देशमुख, श्री प्रशांत बोबडे, श्री धनराज फरकाडे, श्री शेखर चोधरी, डायरेक्टर श्री विजय डोईफोडे, श्री मुकेश धिडसे, श्री विनय ठाकरे, श्री विजय रडके हे उपस्थित होते. संचालन श्री शंकरराव चौधरी, प्रास्ताविक नागपूर चाप्टर चे सेक्रेटरी विनीत गणोरकर व आभार नागपूर चॅप्टर चे चेअरमन राहुल पलाडे यांनी केले.
Connect with KJFFOSCIA for Updates
Subscribe Now: https://www.youtube.com/kjffoscia
Like FB page:https://www.facebook.com/KJFFOSCIA/
Join Group: https://www.facebook.com/groups/kjffoscia