Logo
  Be cool. I am processing your request...

   29 Nov 2017 , 10:33 am




महात्मा फुलेंना अभिवादन व हार अर्पण करत जय ज्योती जय क्रांती च्या गगनचुंबी गर्जनेत स्मृतीदिन साजरा

काल दि. २८, नोव्हेंबर, २०१७ ला राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले, यांच्या स्मृतिदिनी महापुरुष, थोर महात्म्याच्या कॉटन मार्केट चौक, नागपूर येथील पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी १०वाजता माल्यार्पण व अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सौ. नंदाताई जीचकार, माजी़ महापौर सौ. मायाताई युवनाते (मनपा, नागपूर) व निताताई ठाकरे तसेच केजेफोसीआ चे नॅशनल चेअरमन मा. अविनाश भाऊ ठाकरे, नॅशनल सेक्रेटरी मा. रवींद्र आंबडकर, नॅशनल डायरेक्टर मा. नंदू कन्हेर व मा. प्रकाश बोबडे समवेत समस्त केजेफोसीआ (माळी उद्योजक फोरम) टिम उपस्थित होती. मा. प्रकाश बोबडे यांच्या क्रिष्णा ऑटोमोटीव कडून उपस्थितांना शरबत वाटपाचा कार्यक्रम झाला तसेच नागपूर चाप्टर चे व्हाईस चेअरमन मा. रितेश होले यांच्याकडून चहा वाटपाचा कार्यक्रम झाला समवेत केजेफोसीआ नागपूर चाप्टर चेअरमन राहुल पलाडे, सेक्रेटरी विनीत गणोरकर, गिरीश देशमुख, धनराज फरकाडे, शंकरराव चौधरी, डॉ. विजय डोईफोडे व समस्त नागपूर चाप्टर टिम उपस्थित होती. महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग चे मा. गुलाब चीचाटे व मा. राजेंद्र पाटील सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर चाप्टर चे चेअरमन मा. राहुल पलाडे व सेक्रेटरी विनीत गणोरकर समवेत सुधीर सुपले, डॉ. मिलिंद होले यांच्या सोबत समस्त नागपूर चाप्टर ने मेहनत घेतली व अतिशय सूत्रबद्ध पणे महात्मा फुलेंना अभिवादन व हार अर्पण करत जय ज्योती जय क्रांती च्या गगनचुंबी गर्जनेत कार्यक्रम पार पडला.

Connect with KJFFOSCIA for Updates
Subscribe Now: https://www.youtube.com/kjffoscia

Like FB page:https://www.facebook.com/KJFFOSCIA/

Join Group: https://www.facebook.com/groups/kjffoscia