Logo
  Be cool. I am processing your request...

   29 Dec 2017 , 06:20 pm




भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक निर्माणाची माळी समाजाची मागणी. फुले दाम्पत्य सन्मान दिना निमित्य ०१ जानेवारीला देणार पुण्यात धडक.

 महात्मा ज्योतिराव फुले व माता सावित्रीबाई यांनी 01 जानेवारी,1948 रोजी भिडेवाडा,पुणे येथे मुलींची पहीली शाळा सुरू करून स्त्री-षिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.  या ऐतिहासीक बाबीला उजाळा देत ‘‘01 जानेवारी फुले दाम्पत्य सन्मान दिन रॅली ’’चे आयोजन  माळी महासंघाचे अध्यक्ष व माळी उदयोजक फोरम केेजेफोसीआ चे चेअरमन श्री. अविनाष ठाकरे यांचे नेतृत्वात तसेच रॅलीचे संयोजक व सासवड माळी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. रंजन गिरमे यांचे नियोजनात तसेच समाजातील आमदार व विविध संघटनांचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत करण्यात येते.

        महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य जगापुुढे यावे ही मुळ संकल्पना घेवून या रॅलीची सुरवात करण्यात आली असून या आधीच्या वर्शात ज्या मोठया संख्येेने माळी समाज या रॅलीत सम्मीलीत झाला ती संख्या पाहता यंदाच्या वर्षी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक निर्माण करावे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारत रत्न देण्यात यावा, महात्मा फुलेंचे समग्र साहीत्य पुनरप्रकाषित करण्यात यावे , ओबीसींची जणगणना घोशित करण्यात यावी अषा प्रमुख मागण्यांसह माळी समाज 01 जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येने धडक देणार आहे अषी माहीती आयोजकांच्या वतीने संयोजक प्रसिद्धी आणि प्रसार विभाग प्राण् नानासाहेब खांडलकर आणि सहसंयोजक श्री. रावसाहेब अंभोरे व श्री. केशव वाघमारे यांनी दिली.

          या रॅलीच्या निमित्याने महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या पदाधिका-यांची एक नियोजन समीती तयार करून मुंबई व कोकण विभाग, मराठवाडा विभाग, उत्तर महाराश्ट्र विभाग, पष्चिम महाराष्ट्र  विभाग, पूर्व विदर्भ व पष्चिम विदर्भ अशी विभागवार वाटणी करून विभागीय संयोजक, जिल्हा संयोजक, युवक आघाडी, युवती आघाडी, सहकार क्षेत्र, वैदयकीय सेवा, महीला आघाडी, षिक्षण क्षेत्र, विधी व न्याय क्षेत्र यांचे संयोजक नेमण्यात आले आहेतण् हि रॅली भिडेवाडा येथून १ जानेवारीए सकाळी १० वाजता निघून फुलेवाडा येथे रॅली चा समारोप होईल आणि लगेचच सावित्रीबाई सभागृहाच्या प्रांगणामध्ये विविध जिल्हातून आलेल्या कार्यकर्त्यांची प्रातिनिधिक सभा होईल व माळी समाजाच्या वाटचालीची पुढील दिशा ठरवण्यात येईल या कार्यक्रमाकरिता खास करून विविध जिल्हातून येणाऱ्या समाज बांधवांच्या व्यवस्थेची जबाबदारी पुणे जिल्हातील विविध संघटनांनी घेतली असून ३१ तारखेला येणाऱ्या समाज बांधवांची निवासाची व्यवस्था करण्याकरिता माळी समाजातील समाज बांधवाच्या मालकीचे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलेले आहे. अशी माहिती आयोजकाच्या वतीने देण्यात आली.