राज्य शासनाच्या निर्णयाने केजेफोसीआ सोबत जुळलेल्या, नविन व्यवसाय सुरू करण्यास ईच्छुक असणाऱ्यांना मिळणार लाभ.
आज राज्य मंत्रीमंडळाने नवीन व्यवसाय सुरू करणा-य़ा 10000 स्टार्टअप्स ला सहाय्य करण्याकरीता धोरण मंजुर केले. केजेफोसीआ तर्फे या संबंधी वारंवार समाजबांधवांना माहीती देण्यात येत होती. लवकरच या धोरणासंबंधी जीआर निघणार आहे. तरी माळी समाजातील नवऊद्योजकांनी तयारीत असावे असे आवाहन केजेफोसीआ तर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील उद्योजकता वाढीस लागावी यासाठी नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा राज्य सरकारचा मानस असून, त्यादृष्टीने राज्यात 'स्टार्ट अप' धोरण राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. या धोरणामुळे पुढील पाच वर्षांमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ५ लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. पुढील पाच वर्षांत जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमता, माहिती तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जानिर्मिती आदी वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
राष्ट्रीय सकल उत्पादनात (जीडीपी) महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के असून, भविष्यात तो आणखी वाढविण्यासाठी राज्याच्या आर्थिक, औद्योगिक विकासास चालना देण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. मोठ्या संख्येने असलेल्या तंत्रकुशल तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तरुणांना स्वत:चे उद्योग उभारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे हाही या धोरणाचा उद्देश आहे.
मेंबरशीप फॉर्म : http://kjffoscia.org/registration
Connect with KJFFOSCIA for Updates
Subscribe Now: https://www.youtube.com/kjffoscia
Like FB page:https://www.facebook.com/KJFFOSCIA/
Join Group: https://www.facebook.com/groups/kjffoscia