माळी समाजातील व्यापारी, दुकानदार, गृहऊद्योजक, नवतरूण ईत्यादीना आता व्यवसाय करण होणार सोप, २५००० समाजबांधवांना विकु शकतात साहीत्य..!!
प्रतीनिधी:
माळी समाजाची लोकसंख्या हीच माळी समाजाची व्यापारपेठ या संकल्पनेवर गेल्या दीड वर्षापासुन माळी ऊद्योजक फोरम केजेफोसीआ काम करीत आहे.
या दीड वर्षात केजेफोसीआ तर्फे महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातील जवळपास ४३००० कुटुंबांची माहीती संकलीत करण्यात आली. ज्या जिल्ह्यात स्थानिक प्रतिनिधी ने मेहनत घेतली त्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माहीती प्राप्त झाली तर ज्या जिल्ह्यात स्थानिक प्रतिनिधी ची मेहनत कमी पडली तिथे कमी प्रमाणात माहीती संकलीत झाली. तरीही कमी अधीक प्रमाणात सर्वच जिल्ह्यांमधील माळी समाज बांधवांची माहीती संकलीत करण्यात केजेफोसीआ ला यश आलेले आहे.
या ४३००० पैकी २५००० कुटुंबांचे क्राॅस व्हेरीफीकेशन करून समाजातील व्यापारी, दुकानदार,गृहऊद्योजक, नवऊद्योजक यांच्याकरीता ही माहीती केजेफोसीआ चे वेबसाईट वर ऊपलब्ध करून देण्यात येत आहे. टीम केजेफोसीआ तरफे दिलेल्या माहीती नुसार ही फक्त सुरवात आहे. येत्या वर्षभरात दोन लाख कुटुंबांची माहीती संकलीत करण्याचे ऊदिष्ट ठरविण्यात आले असुन येत्या पाच वर्षात माळी समाजातील सर्वच कुटुंबांची माहीती संकलीत करण्याचे ऊदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
व्यापारी , दुकानदार, गृहऊद्योजक, नवऊद्योजक, आपल्या मालाची मार्केटींग या २५००० कुटुंबापर्यंत वैयक्तिक किंवा केजेफोसीआ मार्फत करू शकतात.
जिल्हानिहाय कुटुंबांची माहीती जाणुन घेण्याकरीता खालील लींक वर क्लीक करा..!