Logo
  Be cool. I am processing your request...

   26 May 2018 , 02:30 pm




केजेफोसीआ च्या माध्यमातुन माळी समाजबांधवांनी ऊत्पादीत केलेल्या मालाच्या विक्रीला सुरवात, डिलर डिस्ट्रीब्युटर नेमण्याची प्रक्रीया सुरू.

माळी समाजाची लोकसंख्या हीच माळी समाजाची बाजारपेठ या संकल्पनेवर आधारीत माळी समाजाच्या आर्थिक प्रगती साठी केजेफोसीआ तर्फे विविध धोरणात्मक योजना तयार करण्यात आल्या होत्या. टप्प्या टप्प्याने एक एक योजना केजेफोसीआ तर्फे कार्यान्वित करण्यात येत आहेत. सुरवातिच्या टप्प्यांमधे सभासद नोंदणी करून बिजनेस सुमीट च्या माध्यमातुन केजेफोसीआ ची संकल्पना, नवनवीन रोजगाराच्या कल्पना, सामाजीक बाजारपेठेचे फायदे व परीस्थिती, नव उद्योजकांना उद्योगांच्या माध्यमातुन रोजगाराच्या विविध संधी, एकत्रीकरणातुन उद्योग व्यवसाय व प्रस्थापीत उद्योजकांसाठी उपलब्ध सामाजीक बाजारपेठ अशा विविध विषयांवर उद्योग परीचर्चा, रोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले. 
 
दुसऱ्या टप्प्यात या आयोजनातुन प्रेरणा घेऊन शेकडो तरूणांनी स्वत:च्या व्यवसायाला सुरवात केली त्यातील काहींनी ऊत्पादन क्षेत्रात रूची दाखवली. काहींनी १३३ पब्लीक सेक्टर युनीट मधे पुरवठादार म्हणुन नोंदणी केली व सरकारी क्षेत्रात सामग्री पुरवठा करण्यास सुरवात केली तर काहींनी सेवा क्षेत्रातले व्यवसाय निवडले. काहींच्या मागणी नुसार विशेष ट्रेनिंग देऊन बॅंक लोन सुविधा सुध्दा केजेफोसीआ तर्फे देण्यात आली. तर काहींचे व्यवसाय असुन देखील डीॅक्युमेंटेशन व्यवस्थित नसल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळत नव्हता त्यांना डाॅक्युमेंट व्यवस्थित करण्याकरीता सहकार्य करण्यात आले.या सर्व प्रक्रीयेनंतर समाजाला जसजशी वन ब्रॅंड वन कम्युनिटी ची मूळ संकल्पना कळायला लागली तस तशी प्रस्थापित ऊद्योजक त्यांच्या मालाचे सॅंपल्स केजेफोसीआ कडे पाठवायला लागले व नव ऊद्योजक नविन प्रॅाडक्ट तयार करण्याच्या तयारीला लागले.
 
या सर्व घटणांची माहीती व होत असलेली प्रगती बिजनेस सुमीट च्या माध्यमातुन मांडत असतांना केजेफोसीआ तर्फे काही सभासदांना प्रायव्हेट लामीटेड मार्केटींग कंपनी स्थापन करण्याचे आवाहन केले. सभासदांपैकी जे मार्केटींग चा व्यवसाय करणारे सभासद होते त्यांनी केजेफोसीआ डायरेक्टर सोबत चर्चा करून संकल्पना व योजना समजुन घेतली व खात्री पटल्या वर ग्रोप्युअर नावाची प्रायव्हेट लीमिटेड कंपनी स्थापन केली. केजेफोसीआ कडुन सर्व सभासदांची यादी घेऊन ग्रोप्युअर चे डायरेक्टर उद्योजक सभासदांसोबत व्यक्तिगत भेटले व ऊत्पादीत प्रॉडक्ट ची माहीती घेतली. ज्या प्रॉडक्ट मधे उणीव भासली त्या मधे सुधारणा सुचऊन प्रॉडक्ट विक्रीकरीता ब्रँड रजीस्ट्रेशन करून घेतला. सर्व प्रॉडक्ट साठी आकर्षक पॅकींग मटेरीअल तयार करून घेतले. विक्रीसाठी आता सर्व प्रॉडक्ट तयार आहेत.आतापर्यंत धान्य उत्पादकांपासुन तर कॉस्मॅटीक उपत्पादन करणाऱ्यांनी एकुण २९ प्राॅडक्ट करीता टाय अप केले आहे. लवकरच या ग्रोप्यअर मार्केटींग ची शोरूम नागपूर शहरात सुरू होत आहे..सामाजीक बाजारपेठ चा ऊपयोग मार्केटींग चा ४५ वर्षाचा अनुभव असलेले श्री.दीपक येवले व २० वर्षाचा अनुभव असलेले श्री. विनीत गणोरकर यांनी फार ऊत्तम रीत्या करून घेतला. यां दोघांच्याही नेतृत्वात ग्रोप्यअर कंपनीने ३ महीन्यातच फार मोठी झेप घेतली.
 
या योजनेचा लाभ समाजाच्या अधीका अधीक ऊद्योजकांना, व्यापाऱ्यांना, बेरोजगारांना मिळावा या हेतुने कंपनी चे डिलर डिस्ट्रीब्यटर नेमण्याची प्रक्रीया ग्रोप्यअर कंपनी तर्फे सुरू करण्यात आली आहे तरी ईच्छुकांनी ग्रोप्युअर मार्केंटींग कंपनी चे एम. डी. श्री दीपक येवले यांचेसोबत 9423684032 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन केजेफोसीआ तर्फे करण्यात येत आहे.