Logo
  Be cool. I am processing your request...

   10 Jun 2018 , 05:50 pm




माळी समाजाची उद्योग परिषद थाटात संपन्न - अकोला

स्थानिक रायझिंग सन हॉटेल मध्ये दि ३ जून २०१८ रोजी केजेफोसिया माळी उद्योजक फोरम तर्फे माळी समाजाची उद्योग परिषद संपन्न झाली आहे. या उद्योजक परिषदेला माळी समाजातील उद्योजक व व्यापारी आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माळी उद्योजक फोरम केजेफोसिया चे चेअरमन मा. श्री. अविनाशजी ठाकरे यांनी पॉवर पॉइंट  प्रेझेन्टेशन च्या मार्फत या फोरमचा उद्देश विशद केला. ते म्हणाले की माळी समाजाच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, माळी समाजातील व्यापारी व उद्योजक यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे माळी समाजातील कंत्राटदारांना केंद्र व राज्य शासनामध्ये नोंदणी करून त्यांना कंत्राट देणे व तरुणांना उद्योग-व्यवसाय उभारणी करिता लागणारे भांडवल बँके मार्फत उपलब्ध करून देणे, शासनाचे विविध लायसन्स उद्योजका करिता मिळवून देणे हे प्रमुख कार्य या फोरमचे आहे. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित महात्मा फुले अर्बन कोपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे यांनी माळी समाजातील नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांना बँकेमार्फत भांडवल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगर सेवक जयंत मसने उद्योजक गजानन तायडे, माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री. राजेश जावरकर, प्रदीप लांडे, सागर खालोकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष मयूर निमकर, केजेफोसिया नॅशनल सेक्रेटरी रवींद्र अंबाडकर, सागर खालोकार, प्रदीप लांडे, विनोद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्थाविक संजय बोरोडे, विभागीय अध्यक्ष केजेफोसिया यांनी केले तर प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय संचालक नंदू कणेर, राहुल पल्हाडे, सुरेंद्र अंबाडकर, संजय बोबडे हे उपस्थित होते. तर ग्रोप्यूअर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष दीपक येवले यांनी माळी समाजातील उद्योजकानीं निर्मित वास्थुच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली. या कार्क्रामाचे संचालन सौ. कल्पना तायडे यांनी केले तर कार्यक्रम नियोजन प्रोजेक्ट डायरेक्टर विक्रांत इंगळे प्रशांत फुलारी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दुर्गा भड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री. रंझोडदास जाधव, सौ. प्रगती विक्रांत इंगळे, विठ्ठल तायडे, नंदकिशोर बहादुरे, श्रीकृष्ण गोडे, सौ. राजेश्री जठाळ यांनी परिश्रम केले.