Logo
  Be cool. I am processing your request...

   20 Aug 2018 , 01:16 pm




माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ व्हाईस चेअरमन इंडस्ट्रीयल विंग पदावर उद्योजक श्री प्रदीप राऊत यांची निवड.

औरंगाबाद येथील स्वराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे सीएमडी श्री. प्रदीप चंद्रप्रकाश राऊत यांच्या नावाची  नुकत्याच झालेल्या आमसभे मध्ये केजेफोसिआ चे चेअरमन श्री अविनाश ठाकरे यांनी घोषणा  केली. स्वराज ग्रुप ऑफ इंडस्ट्री मधे स्वराज एन्टरप्राइझेस आर. एस. इंडस्ट्री या दोन कंपनी असून दोन्ही कंपनी चे चेअरमन श्री प्रदीप राऊत आहेत. मूळचे माजलगाव जिल्हा बीड येथील रहिवासी असलेले  श्री. प्रदीप राऊत यांनी  एम. आय. डी सी. वाळूज येथे कंपनी स्थापन करून २००७ पासून या व्यवसायात पदार्पण केले सुरवातीला स्वराज एन्टरप्राइझेस हि एकच कंपनी होती परंतु जिद्दीने आणि मेहनतिने आर. एस. इंडस्ट्री हि दुसरी कंपनी स्थापन करून आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.  श्री राऊत यांचे   कंपनी मार्फत वेडीओकॉन, बजाज आणि इतर मोठ्या कंपनी ला स्प्रिंग, प्रेस कंपोनंट, प्लास्टिक कंपोनंट, फास्टनर्स (नट,बोल्ट), मशीन कंपोनंट , मोल्डिंग कंपोनंट आदी  चा पुरवठा केला जातो. श्री राऊत यांनी नुकताच बीड जिल्ह्यात जैविक खताचा कारखाना सुद्धा सुरु केला आहे. माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ च्या स्थापने पासून श्री प्रदीप राऊत हे केजेफोसिआ चे विश्वस्त आहेत. सामाजिक कार्यात नेहमी ते अग्रेसर असतात. अश्या या बहुआयामी व्यक्तींच्या नियुक्तीचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत असून केजेफिसिआ व्हाईस चेअरमन इंडस्ट्रीयल विंग  पदावरून  माळी समाजातील सर्व इंडस्ट्रियालिस्ट सोबत कोऑर्डिनेशन  करून येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर धोरण बनवून तोडगा काढण्याची प्रमुख जबाबदारी ते पार पाडतील सोबतच सेमिनार, वर्कशॉप चे माध्यमातून माळी समाजातील इंडस्ट्रियालिस्ट ला एका प्लॅटफॉर्म ते आणतील अशी  त्यांच्या कडून समाजाला अपेक्षा आहे.