माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ तीन वर्षांची यशस्वी वाटचाल : १०० पेक्षा जास्त उद्योजक आणि नवउद्योजक झाले लाभार्थी : बाजारपेठ निर्मिती प्रक्रिया गतिशील
५ ऑगस्ट २०१६, माळी समाजासाठी इतिहासात नोंद घेण्याचा दिवस कारण या दिवशी माळी समाजाची उद्योग आणि व्यवसायाला प्रोत्साहन आणि चालना देणारी केंद्रशासन मान्यता प्राप्त कंपनी स्थापन झाली. या देशात अश्या प्रकारची कंपनी स्थापन करण्याचा सन्मान फक्त दोनच समाजाला मिळाला आहे. पहिली कंपनी म्हणजे दलित इंडस्ट्रिअल चेम्बर ऑफ कॉमर्स (डिक्की) आणि दुसरी कंपनी म्हणजे माळी समाजाची क्रांतिसूर्य जोतीराव फुले फोरम ऑफ सोशियो कमर्शिअल अँड इंडस्ट्रिअल ऍक्टिव्हिटी ("केजेफोसीआ"). तसे पाहता "केजेफोसीआ" हे माळी समाजचे एकप्रकारे चेंबर ऑफ कॉमर्स म्हणु शकतो परंतु सध्याच्या नियमानुसार चेम्बर ऑफ कॉमर्स हे नाव देता येत नाही आणि तशीही "केजेफोसीआ" ची व्याप्ती चेम्बर ऑफ कॉमर्स पेक्षा फार मोठी आहे.
चेअरमन श्री. अविनाश ठाकरे मा. उपाध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळ तसेच अध्यक्ष माळी महासंघ यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेल्या तसेच सचिव रवींद्र अंबाडकर यांच्या व्यवस्थापनात वाटचाल करीत असलेल्या माळी उद्योजक फोरम "केजेफोसीआ" ला येत्या ३१ मार्च ला तीन आर्थिक वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्णपणे पारदर्शक व्यवहार आणि "one Brand One Community" या संकल्पनेवर "टीम केजेफोसीआ" च्या मार्गदर्शनात हे कार्य सुरू आहे . "टीम केजेफोसीआ" मधे सासवड माळी साखर कारखान्याचे चेअरमन मा. राजेंद्र गिरमे, मुंबई येथील प्रसिद्ध बिल्डर आणि उद्योजक मा. शंकरराव बोरकर, औरंगाबाद येथील ऑटोमोबाईल इंडस्ट्री स्पेअर पार्ट मॅनुफॅक्चरर मा. प्रदीप राऊत ,अहमदनगर येथील कृषी कॉलेज आणि सद्गुरू डेअरी चे चेअरमन मा. शंकरराव नेवसे, पुणे येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा अनुभव असलेले उद्योजक मा. मदन वाघमारे, कृषी विभागातील सह्द प्रक्रिया उद्योग तज्ञ अमरावती येथील उद्योजक मा. सागर खलोकार, शिक्षण क्षेत्रातील अनुभवी नागपूर येथील उद्योजक मा. अरुण पवार, गव्हर्नमेंट सप्लाय मधील अनुभवी उद्योजक मा. रवींद्र अंबाडकर, कृषी यंत्र सामुग्री मधील विदर्भातील अग्रेसर उद्योजक दागोबा इंजिनीअरिंग चे मालक मा. विश्वास महादुरे, इंडो-युको कोलॅबरेशन मधे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या उद्योजिका सौ. लक्ष्मी भुजाडे-चौधरी, लॅंड डेव्हलपर व्यवसायातील अनुभवी उद्योजक मा. प्रकाश बोबडे, ऍडव्हर्टाइझ व्यवसायातील अनुभवी उद्योजक मा. नंदकिशोर कन्हेरे, ट्रेडिंग व्यवसायातील अनुभवी उद्योजक मा. संजय बोबडे, सर्व्हिस इंडस्ट्री मधील अनुभवी उद्योजक मा. सुरेंद्र अंबाडकर अशा विविध विभागातील व विविध क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ उद्योजकांची टीम या कंपनी मध्ये संचालक पदावर असून माळी समाजामधे उद्योजक व व्यावसायिक निर्माण व्हावे त्याचबरोबर अस्तित्वात असलेल्या उद्योजक व व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वृध्दी व्हावी या करिता एकसंघपणे कार्य करीत आहे. या सर्व संचालकांनी प्रत्येकी १ लाख रुपयांची गुंतवणुक या कंपनी मधे केली आहे हे विशेष.
माळी उद्योजक फोरम "केजेफोसीआ" च्या माध्यमातुन आतापर्यंत दोन उद्योजक मेळावे व प्रदर्शनी, पुणे, नगर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती व पिंपरी चिंचवड येथे उद्योजक परिषद व उद्योजकता शिबीर राबविण्यात आले. माळी उद्योजक फोरम "केजेफोसीआ" च्या माध्यमातुन आतापर्यंत १०० पेक्षा जास्त नवउद्योजक व अस्तित्वात असलेले उद्योजक तथा व्यापारी या मध्ये प्रामुख्याने अहमदनगर चे मधुकर शिंदे,पुणे येथील किरण फरांदे, जयश्री रासने, प्रतिमा राऊत, प्रदीप हुमे, दीपक राऊत,अजय गवळी ,जालना येथील संतोष जमधडे,संतोष रासवे,, औरंगाबाद येथील रुपेश खोबरे,संगमनेर येथील अमित मंडलिक आणि इतर व्यापारी, अमरावती येथील वंदना अकर्ते,स्वप्नील वाघमारे,आशिष पेटे,सुयोग्य कांडलकर,ऋषिकेश सोनटक्के,रायगड येथील दत्तात्रय खेडकर,नाशिक येथील भोजराज लोंढे, स्वप्नील फुले, विवेक सोनवणे ,बुलढाणा येथील कैलास सपकाळ,योगेश जाधव,दीपक तिडके,नागपूर येथील वैशाली शेंडे, जोती ठाकरे,सुरज दहीकर, संजय बन्सोड,प्रशांत बोबडे, कमलेश भेदे, रीतेश होले, वर्षा गोडे,किशोर दिडपाये,सुधीर ढोमणे,विशाल बोराटे,ऋषिकेश सैनी,सुधीर सुपले, वरोरा येथील विविध बचत गट, भंडारा येथील पवन कटणकर, गोंदिया येथील सदुभाऊ विठ्ठले ,राजु नागरीकर,गुळ उत्पादक शेतकरी असे शेकडो नवउद्योजक,उद्योजक,व्यवसायी यांना प्रोत्साहन तथा सहकार्य देऊन व्यापारपेठ उपलब्धता, बँक मॉर्गेज कर्ज,व्यवसाय व्यवस्थापन,सरकारी अनुदान,सरकारी योजना,थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट,सरकारी योजना,या माध्यमातून उद्योजक बनण्यामधे तथा व्यापार वाढी साठी सहकार्य करण्यात आले. या पैकी अनेक उद्योजक फूड इंडस्ट्री मधील असल्याने त्यांचा माल "केजेफोसिआ" या एकाच ब्रँड वर विकल्या जात आहे आणि हे सगळ ऑन रेकॉर्ड आहे.( http://www.kjffoscia.org/businessdiary)
एक बाब या ठिकाणी विशेतत्वाने नमूद करावी लागेल की काही समाज बांधवांनी आमच्या कडे कर्जाची मागणी केली परंतु "केजेफोसीआ" हि कर्ज देणारी संस्था नसुन संस्थेच्या सभासदांकरीता व्यवसाय निर्मिती, मार्केट व्यवस्थापन,सरकारी योजनांचा लाभ,व्यवसाय मार्गदर्शन,सरकारी अनुदान,थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट,बँक मॉर्गेज कर्ज, ट्रेड मार्क, इम्पोर्ट एक्स्पोर्ट लायसन्स मिळवून देण्याकरिता केंद्र शासन मान्यता प्राप्त शेअर होल्डिंग कंपनी आहे.
एखादे झाड लावलं फळ चाखयाला जोपासना करणे आवश्यक आहे. झाडाला पाणी,खत, जमिनीची मशागत या करिता लागणारा खर्च ओघाने आलाच. परंपरागत पद्धतीचा अवलंब केला तर मर्यादित पीक होते परंतु नवीन कल्पना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर पीक वाढत. व्यवसायात सुद्धा असच आहे. व्यवसाय करताना गुंतवणूक करून झाल्यावर संयम, जिद्द, चिकाटी आणि मेहनत अत्यंत आवश्यक आहे. व्यवसाय वाढीकरिता नवीन योजना, सरकारी धोरण,नवीन मार्केट माहित असणे आवश्यक आहे . माळी उद्योजक फोरम सातत्याने फोरम च्या सभासदांकरिता हे सर्व शोधात असते. आणि वेगवेगळ्या कॉन्फरन्स मधून सभासदांना माहिती देत असते. हे सगळं करण्याकरिता लागणारा खर्च हा सभासद शुल्कातून होत असतो
नुकताच "केजेफोसीआ" या कंपनी चा तिसरा ऑडिट रिपोर्ट केंद्र सरकार कडे दाखल करण्यात आला. तीन वर्षाच्या यशस्वी वाटचाली मुळे आता एमएसएमई, खादी ग्रामोद्योग, अन्न व प्रशासन विभाग सारख्या विभागाच्या क्लस्टर डेव्हलपमेंट अनुदान , एमआयडीसी मधे अनुदानित दारावर प्लॉट सारख्या योजनांचा व ईतर सरकारी अनुदानित योजनांचा थेट लाभ आता "केजेफोसीआ" च्या सभासदांना मिळू शकतो.
आजमितीला माळी उद्योजक फोरम "केजेफोसीआ" चे महाराष्ट्रातील तीनशे पेक्षा जास्त उद्योजक सभासद असुन चेंबर ऑफ कॉमर्स प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शाखा स्थापन करण्याचे काम सुरु आहे. सद्यस्थितीत नागपूर,पुणे,औरंगाबाद,अमरावती,नगर,नाशिक, पिंपरी चिंचवड या जिल्ह्यामध्ये सभासदांमधून काही पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहे रीक्त जागांवर पदाधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आपल्या समाजामधे एक त्रुटी आहे ती म्हणजे एखादी चांगली संकल्पना कोणी समोर आणली तर त्या संकल्पनेवर सर्वांनी एकत्र काम करायचे सोडुन काही जण संकल्पना मांडणाऱ्या संस्थेसोबत किंवा व्यक्ती सोबत न जुळता ती संकल्पना स्वतःच्या नेतृत्वात किंवा एखाद्या संस्थेच्या नावावर स्थानिक स्तरावर राबविण्याचा प्रयत्न करतात. हे करत असतांना हि मंडळी समाजाला एकत्र येण्याचे भावनिक आवाहन करतात परंतु जाणते अजाणते पणे त्यांची हि कृती समाजामध्ये फूट पाडत असते. अशा लोकांचा हे करण्यामागचा हेतू कोणताही असला तरी व्यक्ती नुसार कार्यपद्धती बदलत जाते व मूळ संकल्पनेचा हेतू मागे पडतो. आज समाजमध्ये काही लोक "केजेफोसीआ" द्वारा मांडलेल्या संकल्पनेला वेगवेगळ्या पद्धतीने मांडून भ्रमित करतांना दिसत आहेत. काही तर या माध्यमातून पैसे गोळा करीत असल्याची चर्चा सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. अशा लोकांपासून समाजाने सावध असले पाहिजे. उद्योग किंवा व्यापार क्षेत्रातील कोणत्याही संस्थे सोबत जुळतांना ती संस्था नोंदणीकृत आहे कि नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. अश्या प्रकारे भ्रमित करणाऱ्या व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करतांना अश्या व्यक्तीचा इतिहास तपासून घेतला पाहिजे. आपल्या व्यवसायाची माहिती देतांना आपली माहिती सुरक्षित राहिली पाहिजे याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. सायबर क्राईम च्या या विश्वात अशा माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो.
माळी उद्योजक फोरम "केजेफोसीआ" ची सॉफ्टवेअर टीम या सगळ्या गोष्टीची काळजी घेत असते.
माळी समाजातील जास्तीत जास्त उद्योजक, व्यापारी, नवउद्योजक यांना लाभ व्हावा या करिता लवकरच "केजेफोसीआ" कंपनी चे शेअर उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. मध्यंतरी च्या काळात काही तांत्रिक अडचणी मुळे थांबविण्यात आलेली सभासद नोंदणी आता पुन्हा सुरु करण्यात आली आहे. तसेच लवकरच माळी समाजातील उद्योजकांना वैश्विक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या करीता ऑन लाईन पोर्टल सुद्धा लाँच करीत आहोत. यंदाचा वर्षीचा उद्योजक मेळावा औरंगाबाद शहरात घेण्याचा आमचा मानस असून स्थानिक प्रतिनिधी सोबत चर्चा करून लवकरच तारीख समाजबांधवांना कळविली जाईल.
चला तर मग माळी उद्योजक फोरम "केजेफोसीआ" सोबत जुळुन स्वतःचा आर्थिक विकास करण्याच्या संधीचा लाभ घेऊ या.
माळी उद्योजक फोरम "केजेफोसिआ" बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास खालील लिंक वर क्लीक करा (http://www.kjffoscia.org/)
!! माळी समाजाचा एकमेव उद्योजक ब्रँड "केजेफोसीआ" !!