Logo
  Be cool. I am processing your request...

   03 Mar 2020 , 12:25 am




माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ अपकमिंग आणि एस्टॅब्लिश्ड बिझनेसमॅन साठी सोन्याची खाणं : नव उद्योजिका लक्ष्मी भुजाडे-चौधरी

हाय फ्रेंड्स मी लक्ष्मी भुजाडे-चौधरी , माझा इंडो-युको कोलॅबरेशन मधे सोलर एनर्जी बेस्ड प्रॉडक्ट चा व्यवसाय आहे. मी मूळची नागपूर ची, इंजिनीअरिंग नंतर एमबीए करण्याकरिता पुण्याला आली. एमबीए करतानाच बिझनेस सुरु केला आणि आता गेल्यावर्षी पासून लग्नानंतर पुण्यातच सेटल्ड आहे.

आज काही महत्वाच्या टिप्स देण्याकरिता मी या ठिकाणी मत मांडत आहे. मी जे मांडत आहे ते माझे मत आहे ज्याला पटेल त्याने एक्सेप्ट करायचे ज्याला नाही पटलं त्याने सोडुन द्यायचे.

कधी कधी काय होत आपण ज्याच्या शोधात असतो ते आपल्या समोर असत पण अज्ञानाने किंवा चुकीच्या  पर्सेप्शन मुळे ते आपल्याला गवसत नाही. आज अनेक यंगस्टर्स बिझनेस सुरु करायचा या करिता लोन घ्यायला बँक, गव्हर्नमेंट सेक्टर च्या चकरा मारतांना दिसतात ९५ टक्केना लोन मिळतच नाही. ५ टक्के ना मिळत. काहीजण फिनान्स न घेता स्वतःचा फंड युटिलाईझ करून बिझनेस सुरु करतात. यातील अनेकांचा बिझनेस कालांतराने कोलॅप्स झालेला दिसतो. जो सर्वाइव्ह होतांना दिसतो तो फक्त परंपरेने ज्याच्या कडे बिझनेस आहे तोच दिसतो.  हे असं का होत आणि यातून मार्ग काय आहे हे समजुन घेणं आवश्यक आहे.

आज आपण कोणत्याही बिझनेस टायकुन ची चर्चा करतो तेव्हा  त्याच्या बद्दल एक लाईन म्हणतोच हा शुन्यातून वर आला, खुप मेहनत केली याने. मला सांगा तुम्ही आम्ही मेहनत तर सगळेच करतो पण सगळेच सक्सेसफुल होतात का? नाही ना. समजा हे सगळे शुन्यातुन वर आले तर यांच्या जवळ इन्व्हेस्ट  करायला फंड  कुठून आला असेल? जे यशस्वी झाले या सर्वांची हिस्टरी वाचली तर त्यांच्या जवळ फंड नव्हता, त्यांनी  पूर्ण प्लांनिंग करून व्यवसाय सुरु केलेला दिसतो . फंड रेझिंग,गव्हर्नमेंट ग्रँड,बँक लोन, इंडस्ट्रिअल लॅन्ड, बँक सबसिडी, मार्केट, फ्युचर प्लॅनिंग   या सर्व बाबींचा नीट अभ्यास करून बिझनेस सुरु केलेला दिसतो.

मार्केट मध्ये सर्वाइव्ह करायचं असेल तर तुमचे प्रॉडक्ट मार्केट रेट कंपॅटेबल असले पाहिजे आणि हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्हाला कन्स्ट्रक्शन सबसिडी, मशिनरी सबसिडी , इलेक्ट्रिक सबसिडी, वॉटर सबसिडी, इंडस्टील लॅन्ड सबसिडी, बँक लोन सबसिडी,  बँक मोनोटोरिअम पिरीएड, हे  सर्व  मिळत.  जर या सर्व फॅसिलिटी तुम्हाला गव्हर्नमेंट कडून मिळाल्या तर तुमची प्रोजेक्ट कॉस्ट कमी होते, लोन रिपेयमेन्ट ला अडचण होत नाही. याचच मिनिंग असे कि ज्या बिझनेस मधे आपला फंड कमी आणि गव्हर्नमेंट फंड जास्त असेल तोच  बिझनेस सर्वाइव्ह होतो.

आता आपल्या पुढे क्वश्चन आला असेल के हे सगळं मिळवायचं कस तर पूर्वी छोट्या इंडस्ट्री साठी एमआयडीसी मधे प्लॉट उपालब्ध राहायचे, काही ठिकाणी आजही आहेत परंतु जमिनीचे रेट  इतके वाढले कि कॉमन मॅन ला घेणं   शक्य होत नाही आणि ग्रुप करून  नि  घ्यायचा म्हटलं तर प्लॉट ची संख्या खूप  कमी असते आणि सरकार त्याचा  लिलाव काढत त्या पिरेड मध्ये मिळाला तर ठीक. एमआयडीसी मध्ये प्लॉट नाही तर कोणतीही सबसिडी नाही.

मोठ्या इंडस्ट्री साठी तुम्ही जमीन विकत घेऊन त्या जमिनीला इंडस्ट्रियल लँड म्हणुन डेव्हलप करून सर्व सबसिडी मिळवु शकता पण त्यासाठी जमीन विकत घ्यावी लागेल जे कॉमन मॅन ला शक्य होत नाही.

मध्यंतरी च्या काळात अनेक फ्रॉड केसेस समोर आल्या ज्यात लोकांनी फक्त सबसिडी उचलण्या करिता बिझनेस सुरु केले आणि नंतर बंद केले. एमआयडीसी मधे प्लॉट घेतले ते रेंट किंवा लीझ वर दिले. आणि कॉमन मॅन , फार्मर्स(शेतकरी)  यांच्या साठी बनलेल्या स्कीम चा फायदा ऐशटॅब्लिश्ड बिझनेस वाले जास्त घ्यायला लागले.

यावर तोडगा आणि  ग्लोबलायझेशन व  नवीन टेक्नॉलॉजी मुळे वाढती बेरोजगारी  या दोन्हींचा विचार करून  कॉमन  मॅन , फार्मर्स(शेतकरी) हे प्रॉडक्शन  बिझनेस मधे यावे या करिता २०१२ मधे गव्हर्नमेन्ट नि ग्रुप बिझनेस ला जास्तीत जास्त सबसिडी मिळेल अशी पॉलिसी बनवली. या पॉलिसी नुसार एनजीओ च्या माध्यमातुन सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले. पूर्वी एनजीओ या ट्रस्ट ऍक्ट अंतर्गत रजिस्टर असायच्या आणि त्यां सोशल वर्क पुरत्या मर्यादित होत्या कामा मध्ये ट्रान्स्परन्सी नसायची आणि  या एनजीओ स्टेट गव्हर्नमेंट च्या अंडर असायच्या.

यावर तोडगा म्हणुन  सेंट्रल गव्हर्नमेंट ने कंपनी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1956 मधे सुधारणा केली आणि  कंपनी रजिस्ट्रेशन ऍक्ट अंडर सेक्शन 8  रजिस्ट्रेशन असलेल्या कंपनी ला एनजीओ चा दर्जा देण्याचे डिसिजन घेतले.

आता रुल नुसार ज्या अंडर सेक्शन 8 रजिस्टर्ड  एनजीओ ने  तीन वर्ष पूर्ण  करून  तीन वर्षाचा ऑडिट रीपोर्ट गव्हर्नमेंट ला सबमिट केला आहे त्या एनजीओ ला कॉमन फॅसिलिटी सेंटर चा दर्जा दिला जातो. त्या एनजीओ मधे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट चा एक एक ऑफिसर डायरेक्टर बनविल्या जातो. ज्यांना  मॅन्युफॅक्चरिंग  इंडस्ट्री सुरु करायची असेल त्यांना कॉमन फॅसिलिटी सेंटर च्या माध्यमातुन  प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून दिल्या जातो ,  ट्रेनिंग दिल्या जाते,,मार्केटिंग ची माहिती दिल्या जाते,गव्हर्नमेंट सबसिडी चा अर्ज गव्हर्नमेंट कडे पाठविल्या जातो,बँक फंडिंग उपलब्ध करून दिल्या जात. प्रॉडक्शन सुरु करून बिझनेस लाईन अप होत पर्यंत सर्व को-ऑपरेशन दिल्या जात.

इयर 2016  ला  नागपूर येथील उद्योजक मेळाव्या मध्ये मला यंग एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर चा अवॉर्ड मिळाला त्याच वर्षी अविनाश ठाकरे सर आणि रवी अंबाडकर सर यांनी अंडर सेक्शन 8 कंपनी रजिस्टर करून त्यात  महाराष्ट्रातील माळी कम्युनिटी मधील सर्व दिग्गज इंडस्ट्रियालिस्ट यांना डायरेक्टर करुन फोरम तयार केला. त्या वेळी अनफॉर्मल चर्चा करतांना अविनाश ठाकरे सर यांनी सांगितले होते कि 2019 नंतर ही एनजीओ जिचं नाव आहे "केजेफोसिआ" क्रांतिसूर्य जोतीराव फुले फॉर्म ऑफ सोशिओ कमर्शिअल अँड इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी हि माळी समाजातील अपकमिंग आणि एस्टॅब्लिश्ड बिझनेसमॅन साठी सोन्याची खाण असेल ज्याला जितकं सोन पाहिजे त्याला  त्याच्या कॅपॅसिटी नुसार मिळेल.

अविनाश ठाकरे सर त्यावेळी असं का म्हणाले ते मला आता समजलं. या एनजीओ ला या वर्षी  तीन फायनान्शिअल इयर्स पूर्ण झाले आणि तीनही वर्षाच्या ऑडिट रिपोर्ट ला गव्हर्नमेन्ट चे अप्रुव्हल आले. आता ही एनजीओ गव्हर्नमेंट रूल नुसार कॉमन फॅसिलिटी सेंटर बनुन माळी कम्युनिटी च्या अपकमिंग आणि एस्टॅब्लिश्ड बिझनेसमॅन ला बिझनेस सेटअप करून देऊ शकते.

2016 पासून मी ठाकरे सरांचे युटयूब वरील विडिओ पाहत आहे 2016 साली कॅल्स्टर डेव्हलोपमेंट,फार्मर प्रोड्युसिंग कंपनी , ग्लोबल मार्केट यांचं महत्व सांगताना  २०२० पर्यंत गव्हर्नमेंट ऍग्रीकल्चर बेस्ड इंडस्ट्री वर काँसंट्रेट करेल समाजातील न्यू जनरेशन नी या संधीचा लाभ घ्यायला स्वतःला तयार केलं पाहिजे हे त्यांनी केलेले आवाहन  प्रत्येक व्हिडीओ मधे बघायला मिळेल. गेल्या तीन इयर्स चे बजेट पहिले आणि आज २०२० चा गव्हर्नमेंट चा इंडस्ट्रिअल प्लॅन पहिला तर ठाकरे सरांनी जे सांगितले ते खरे होतांना दिसत आहे.

बिझनेस करा असा सल्ला देणारे खूप सापडतील. यूट्यूब वरील व्हिडीओ, एक्स्पर्टस चे लेख कॉपी पेस्ट करून सल्ला देणारे खुप सापडतील परंतु प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे आजकाल सापडत नाही. आपली जनरेशन खूप लकी आहे. आज आपल्याला एक रेडी मेड प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आणि मी तर खूपच लकी आहे कारण मी माळी उद्योजक फोरम "केजेफोसिआ" ची डायरेक्टर या नात्याने एक पार्ट आहे. फोरम तरफे तुमच्या करिता एक महत्वाच डिसिजन  घेतल आहे, एक दोन दिवसात रवी अंबाडकर सर तुमच्या करीता आनंदाची बातमी घेऊन येणार आहे..

आनेवाला समय उडाण भरने का है ।। अपने  पंखो  को फैलाए रखाना ||