Logo
  Be cool. I am processing your request...

   07 Mar 2020 , 03:53 pm




माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ ची माळी समाजाला भेट, पुढील पाच महिने सभासदत्व निशुल्क : सचिव रवींद्र अंबाडकर यांची घोषणा : जास्तीत जास्त व्यावसायिकांनी लाभ घ्यावा असे केले आवाहन

माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ चे चेअरमन मा. अविनाश ठाकरे यांचे संकल्पनेतून २०१६ साली स्थापन झालेल्या माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ ला नुकतेच तीन वर्ष पूर्ण झाले. फोरम च्या स्थापने पासून मा. अविनाश ठाकरे यांनी दिलेल्या व्हिजन २०२०(फोरमला २०२० मधे कोणत्या सुविधा राहू शकेल)   नुसार तंत्रशुद्ध अभ्यासाच्या आधारावर तयार आलेले धोरण  सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून  राबविण्याचे रचनात्मक कार्य फोरम करीत आले आहे. आपल्याला माहीतच आहे माळी उद्योजक फोरम केजफोसिआ ही केंद्र सरकार मान्यताप्राप्त सेक्शन ८ कंपनी असुन तीनही वर्षाच्या आर्थिक अहवालाला मान्यता मिळाल्यामुळे फोरम च्या सभासदांना नवीन उद्योग सुरु करण्याकरीता केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळु शकतो. यातील सर्वच योजनांचा सर्वांना सारखाच लाभ मिळेल असे नाही  कुणाला ९० टक्के सब्सिसीडी , कुणाला ७० टक्के, कुणाला ३५ टक्के,कुणाला १५ टक्के, कुणाला ३ टक्के, कुणाला  बँक लोन तर काहींना फक्त व्यापारपेठ अश्या प्रकारचा लाभ मिळु शकतो. या योजनांचा लाभ ज्याला कुणाला पाहिजे असल्यास तो माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ चा सभासद असणे आवश्यक आहे. 

ज्या वेळेला माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ ची स्थापना झाली त्यावेळेपर्यंत उद्योग या विषयावर काम करण्याकरिता एखादी फोरम स्थापन होऊ शकते   असा विचार देखील कुणाच्या मनात नव्हता. सर्वांसाठी हे सगळं नवीन होत. नियमा नुसार फोरम ला सुद्धा तीन आर्थिक वर्ष पूर्ण होत पर्यंत  ३०० सभासदांचीच परवानगी होती. सभासदांना सुध्दा फोरम ला तीन वर्ष पूर्ण होईस्तोवर अधिकृत रीत्या कोणतीही लाभाची योजना मिळू शकत नव्हती. आमच्या पुढे  सुद्धा तीन वर्ष उद्योग विषयक विविध कार्यक्रम राबवुन फोरम ला चालविण्याचे आव्हान होत. अशावेळी समाजातील १३ उद्योजकांनी प्रत्येकी १लाख रुपये भरून डायरेक्टर सभासदत्व घेतले या मध्ये प्रामुख्याने श्री. अविनाश ठाकरे, श्री. शंकरराव बोरकर, श्री. राजेंद्र गिरमे, श्री प्रदीप राऊत, श्री. शंकरराव नेवसे,श्री. रवींद्र अंबाडकर, श्री. सागर खलोकार, श्री. विश्वास महादुरे , श्री.मदन वाघमारे, श्री नंदकिशोर कन्हेरे, श्री. प्रकाश बोबडे, श्री.सुरेंद्र अंबाडकर, सौ. लक्ष्मी भुजाडे-चौधरी यांचा समावेश आहे या सोबतच शेकडो बांधवांनी फोरम द्वारा ठरवून दिलेल्या फी स्ट्रक्चर प्रमाणे फोरम चे सभासदत्व घेतले. या सर्वांची यादी वेबसाईट वर आहे.  या सर्व निधीतून दोन उद्योजक प्रदर्शनी, पूणे, पिंपरी चिंचवड,नागपूर, अमरावती, अकोला,औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथील उद्योग मेळावे आणि विविध तालुक्याच्या ठिकाणी उद्योजगता मार्गदर्शन शिबीर, शेतकरी शिबीर व विविध सामाजिक उपक्रमाचे कार्य सुरु आहे. या सर्वांच्या सहकार्या मुळे आज माळी समाजामधे केजेफोसिआ चा ब्रँड तयार होऊ शकला व  केजेफोसिआ सारखा  मोठा उद्योग प्लॅटफॉर्म समाजासाठी तयार होऊ शकला  . या तीन वर्षात बऱ्याच सभासदांना आम्ही मा. अविनाश ठाकरे यांच्या राजकीय संबंधातून व सर्व डायरेक्टरच्या वैयक्तिक संबंधातुन काही प्रमाणात लाभ मिळवुन देऊ शकलो आणि समाजामधे उद्योगविषयक रचनात्मक चर्चा घडवून आणून शेकडो युवकांना उद्योग क्षेत्रात स्टॅन्ड करू शकलो याचा देखील आम्हाला आनंद  आहे. 

माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ चा दृष्टिकोन खूप व्यापक आहे आणि याच्या विस्ताराला कोणतीही मर्यादा नाही. आमच्या दृष्टीने आत्ता कुठे अडचणी चा काळ संपला आहे आणि सुगीचे दिवस आले आहे. जमीन कसली आहे पेरणी करणे बाकी आहे. 

माळी समजा मध्ये "बिझनेस संस्कृती" रुजवण्याची काही गरज नाही ती उपजतच या समाजात आहे. या समाजाकडे सर्वच आहे जिद्द, चिकाटी, बुद्धिमत्ता, संयम,ज्ञान,महत्वकांक्षा आणि आर्थिक सुबत्ता सुद्धा आहे, कमी आहे ती  फक्त कौशल्य, आत्मविश्वास,माहितीचा अभाव, प्लॅटफॉर्म आणि संधी ची. हे सर्व माळी उद्योजक फोरम  केजेफोसिआ च्या माध्यमातुन देऊन समाजामधे आमूलाग्र बदल घडविण्याचा आमचा मानस आहे. 

समाजाच्या सर्वच व्यावसायिकांना लाभ व्हावा याकरिता माळी उद्योजक फोरम द्वारा काही महत्वाचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. हे निर्णय टप्प्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. 

ज्यांचा कोणताही व्यवसाय नाही व अस्थायी किंवा फिरते दुकान असलेले व्यापारी आणि शेतकरी  यांच्याकरिता योजना दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे.कृपया अशांनी या योजने अंतर्गत अर्ज करू नये. 

पहिल्या टप्प्यात माळी समाजातील सर्व स्थायी दुकान असलेले विक्रेते,सर्व्हिस प्रोव्हायडर,प्रोफेशनल सर्व्हिस प्रोव्हायडर,मॅन्युफॅक्चरर यांना सभासदत्व निशुल्क देण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजने नुसार सभासद अर्ज करते वेळी कोणत्याही सभासदाला सभासद फी देण्याची गरज नाही. माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ तर्फे गेल्या ४ वर्षात स्वतःची व्यापारपेठ तयार करण्यात आली आहे. माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ च्या मार्केटिंग चमू कडून या सभासदांना बिझनेस दिला जाईल. या बिझनेस मधून जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिट मधून सभासद फी भरण्याची मुभा देण्यात आली आहे. जो पर्यंत फोरम च्या माध्यमातून सभासदाला लाभ होणार नाही तो पर्यंत सभासद फी भरण्याची आवश्यकता नाही. हि योजना ५ मार्च २०२० पासून लागु करण्यात आली असून ५ ऑगस्ट २०२० पर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जदारांकरिता लागू राहील. ऑनलाईन सभासद अर्ज प्राप्त झाल्यावर त्या अर्जाची छाननी करून आठ दिवसाच्या आत सभासदत्व दिले जाईल. या योजने साठी पात्र असलेले व्यवसायी खालील प्रमाणे राहील. 

१) सर्व स्थायी दुकान असलेले दुकानदार,विक्रेते  (उदा:किराणा , फूटवेअर ,कापड ,रेडिमेड गारमेंट्स, होजिअरी ,फळ, भाजी,फूल, स्टेशनरी , औषधी , गिफ्ट आयटम ,व्हेईकल स्पेअर पार्ट,घड्याळ, टीव्ही,फ्रिज,इलेकट्रोनिक,इलेक्ट्रिकल, मोबाईल ,काम्पुटर, सोलार ,होम अप्लायन्सेस  आयटम, बिल्डिंग मटेरियल,  धान्य ,सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ, डेअरी आयटम, वाहन, फर्निचर, क्रॉकरी ,स्टील भांडे ,किचन आयटम, नर्सरी आयटम  विक्रेते ,कृषी केंद्र, हॉटेल, रेस्टॉरंट,टी स्टॉल, इत्यादी..) 

२) सर्व स्थायी दुकान असलेले सर्व्हिस प्रोव्हायडर (उदा:पीठ गिरणी, झेरॉक्स मशीन सेंटर,व्हेईकल सर्व्हिस स्टेशन, लॉन्स, मंगल कार्यालय, गोडाऊन, ट्रॅव्हल एजन्सी, ड्राय क्लिनर,इलेकट्रिशिअन, प्लम्बर, पेंटर, बागकाम करणारे,फॅब्रिकेटर , मोटार गॅरेज ,ब्युटी पार्लर,टेलर,ड्रेस डिझायनर,कम्प्युटर इन्स्टिट्युट, ई-सेवा केंद्र, डीटीपी सेंटर ,प्रिंटर्स,फ्लोरिस्ट,फोटोग्राफर,कोचिंग क्लास,स्टडी पॉईंट सेंटर, इलेकट्रीक ,इलेकट्रोनिक , मोबाईल,कम्पुटर,होम अप्प्लायन्सेस   रिपेरिंग सेंटर,मंडप डेकोरेशन बिछायत केंद्र, कॅटरिंग सर्व्हिस, वॉटर टँकर, बोअरवेल मशीन, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस  इत्यादी...) 

३) सर्व स्थायी दुकान असलेले प्रोफेशनल सर्व्हिस प्रोव्हायडर (उदा: आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल डिझायनर, एलआयसी एजंट, वकील, चार्टर्ड अकाउंटंट , डॉक्टर,पत संस्था , शिक्षण संस्था,सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर, हॉस्पिटल, बँक, प्रॉपर्टी डीलर, बिल्डर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, प्रोजेक्ट कन्सल्टंट,नोटरी,होम ट्यूटर, म्युसिक ऍकॅडमी, ऑर्केस्ट्रा ग्रुप,स्पोर्ट्स अकॅडेमि .... इत्यादी)

४)सर्व मॅन्युफॅक्चरर (उदा: गृह उद्योग, दाल मिल,राईस मिल,शुगर मिल,ऑइल मिल,कॉटन मिल, रेड़ीमेड गारमेंट्स,मसाले, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, ऑटोमोबाईल स्पेअर पार्टस, बॉडी हेल्थ प्रोडक्ट,पेपर आयटम,फॅब्रिकेशन आयटम, फर्निचर आयटम, ऍग्रीकल्चर मशीन, स्टील आयटम,प्लास्टक आयटम, इंडस्ट्रिअल मशीन, पॅकिंग आयटम,केमिकल आयटम,मिनरल वॉटर , डेअरी आयटम, ऍग्रीकल्चर सीड,इलेक्र्टिकल आयटम, इलेकट्रोनिक्स आयटम, सोलार आयटम,पशु खाद्य, इत्यादी). 

या यादीत नाव नसलेला परंतु कोणताही व्यवसाय करणारे स्थायी दुकान असलेले कोणतेही व्यवसायी या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

ऑनलाईन अर्ज माळी उद्योजक फोरम च्या वेबसाईट वरून भरता येईल.

आपल्याला सभासद बनविल्यानंतर केजेफोसिआ कार्यालयाकडून सभासद क्रमांक दिल्या जाईल.

समाजातील जास्तीत जास्त व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळावा या करिता सर्वांनी सहकार्य करावे अशी टीम केजेफोसिआ च्या वतीने सर्वांना विनंती आहे. .   

निशुल्क सभासदत्व योजने अंतर्गत सभासद बनण्याकरीता खालील लिंक वर क्लिक करा.  

http://www.kjffoscia.org/registration/index

 

आपला 

रवींद्र अंबाडकर 

सचिव केजेफोसिआ 

माळी उद्योजक फोरम