Logo
  Be cool. I am processing your request...

   07 Sep 2020 , 06:13 pm




माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ करणार १८ सप्टेंबर ला मार्केटिंग प्लॅटफॉर्म चे लॉन्चिंग ::केजेफोसिआ चेअरमन श्री अविनाश ठाकरे यांची घोषणा.

प्रतिनिधी::

माळी उद्योजक फोरम चा अत्यंत महत्वाकांक्षी आणि महत्वपूर्ण प्रकल्प  " मार्केटिंग प्लॅटफॉर्म" चे शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी लॉन्चिंग करण्यात येणार आहे अशी घोषणा केजेफोसिआ चेअरमन अविनाश ठाकरे यांनी आज केली. केजेफोसिआ च्या सर्व डायरेक्टर सोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून. येणाऱ्या सणासुदीच्या काळाचा व्यापाऱ्यांना लाभ मिळावा या दृष्टीने हि तारीख निवडण्यात आली आहे. केजेफॉसिआ च्या वर्धापन दिवशी या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. या घोषणे नंतर मोठ्या प्रमाणात माळी समाजातील व्यापारी या योजनेचा लाभ घेण्याकरीता  अर्ज करीत असून बऱ्याच व्यापाऱ्यांचे  ई-शॉप सुरु करण्याचे कामाला सुरवात झाली आहे.प्रत्यक्षात खरेदी विक्री हि १८ सप्टेंबर नंतर सुरु करण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पाचे दोन टप्पे निश्चित करण्यात करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात सर्व विक्रते(SELLER) ज्या मध्ये सर्व प्रकारचे ठोक व चिल्लर दुकानदार, उत्पादक तसेच सर्व सेवा व्यवसायी (Domastic and Professional Service Provider) यांचा समावेश असून दुसरा टप्पा ज्या मधे रीअल इस्टेट(Real Estate Industry) आणि हॉटेल्स(Hospitality Industry) यांचा समावेश असेल. दुसरा टप्पा  हा डिसेंबर मधे लॉन्च करण्यात येईल. या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असलेला माल हा स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकल्या जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत माल पाठ्वण्याकरिता ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा सहयोग घेण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्म वर आलेल्या व्यापाऱ्यांना स्वात:चे डिजिटल मार्केटिंग पोर्टल तसेच मोबाईल अँप तयार करण्याची गरज नसून हि सर्व सुविधा या मार्केटिंग प्लॅटफॉर्म वरच उपलब्ध आहे या मार्केटिंग पोर्टल च्या माध्यमातून डिस्ट्रिब्युशन सिस्टम मधे आणि कमिशन एजन्ट म्हणून काम करणाऱ्यांसाठी सुद्धा फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे.तसेच या  प्लॅटफॉर्म वर हजारो वस्तू उपलब्ध राहणार असल्याने नव उद्योजकांना बिना लागत व्यवसायाची आयतीच संधी उपलब्ध होणार आहे.   

मार्केटिंग पोर्टल लॉन्चिंग चा हा कार्यक्रम वेबिनार च्या माध्यमातून होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण केजेफोसिआ च्या वेब पोर्टल वरून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केजेफोसिआ चे डायरेक्टर मा. श्री. शंकरराव बोरकर, श्री . रंजन गिरमे,श्री. शंकरराव नेवसे, श्री प्रदीप राऊत, श्री. मदन वाघमारे, श्री. अरुण पवार, श्री. सागर खलोकार,श्री.विश्वास महादुरे, श्री.ज्ञानेश्वर लोखंडे , श्री. संजय बोबडे,श्री. नंदकिशोर कन्हेरे ,श्री. प्रकाश बोबडे, श्री. सुरेंद्र अंबाडकर ,सौ. लक्ष्मी भुजाडे चौधरी. तसेच मार्केटिंग कंपनी चे डायरेक्टर श्री. दीपक येवले श्री. विनीत गणोरकर,श्री. राहुल पलाडे  हे वेबिनार वर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती केजेफॉसिआ चे नॅशनल सेक्रेटरी श्री. रवींद्र अंबाडकर यांनी दिली