माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ पार केला १००० सभासदांचा पल्ला::: लवकरच जिल्हानिहाय शाखा निर्माण करणार
माळी समाजाचे एकमेव केंद्रशासन मान्यता प्राप्त उद्योजक फोरम केजेफोसिआ ने नुकताच १००० सभासदांचा पल्ला गाठला. ५ ऑगस्ट २०१६ ला फोरम ची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून सातत्याने फोरम माळी समाजातील व्यापारी व सेवा व्यवसायी यांच्या करीता कार्य करीत आहे. सुरवाती च्या कालखंडात अनेकांनी या फोरम ची अवहेलना केली परंतु सातत्य, जिद्द, चिकाटीव मेहनतीच्या भरवश्यावर फोरम च्या पदाधिकाऱ्यांनी आपले कार्य अहोरात्र चालू ठेवले याचा हा परीणाम असल्याचे फोरम चे अध्यक्ष श्री. अविनाश ठाकरे यांनी सांगितले. फोरम हे केंद्र शासनाच्या कंपनी रेजिस्ट्रेशन ऍक्ट च्या सेक्शन ८ अ अंतर्गत नोंदणीकृत असल्याने तीन वर्षाच्या यशस्वी वाटचाली मुळे उद्योजकांकरिता कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणून काम करू शकत. ज्यामध्ये उद्योजकांना अनुदान मिळवून देणे, बँकांकडून कर्ज मिळवून देणे, सरकारी अनुदानित योजनांचा लाभ मिळवून देणे, ऍग्रो बिझनेस अनुदान मिळवून देणे, एमएसएमई ,डीआयसी ,खादी ग्रामोद्योग यांच्या सहयोगाने विविध योजनांचा समाजाला लाभ मिळवून देणे इत्यादी कार्य येतात. फोरम ने नुकतीच समाजबांधवांना मार्केटिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असून येत्या १८ सप्टेंबर ला या प्लॅटफॉर्म चे लॉन्चिंग होणार आहे. या मार्केटिंग प्लॅटफॉर्म वर सर्व विक्रेते, सर्व सेवा व्यवसायी, रिअल इस्टेट व्यवसायी,हॉटेल व्यवसायी, सर्व उत्पादक आपले ई-शॉप उघडून आपला माल स्थानिक,राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकू शकतात. येणाऱ्या काळात मोठ्या कंपन्यांचे रीटेल व्यवसायात होणारे आक्रमण पाहता हा प्लॅटफॉर्म माळी समाजातील व्यापाऱ्यांकरीता फार मोठी संधी असल्याचे मत जाणकार मांडतांना दिसत आहेत. आपल्या समाजातील व्यापाऱ्यांचा दूरदृष्टीने विचार करून अशाप्रकारचा मार्केटिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे केजेफोसिआ हे भारतातले एकमेव उद्योजक फोरम आहे.
फोरम चा वाढता व्याप पाहता फोरम च्या धोरणा नुसार सभासदांची संख्या १५०० पार झाल्यावर जिल्हानिहाय शाखा सुरु करण्यात येईल व सभासदांमधूनच
पदाधिकारी नेमण्यात येणार आहेत. ज्या गतीने सभासद बनण्याकरीता समाजबांधव अर्ज करीत आहेत ती पाहता लवकरच जिल्हानिहाय शाखा देण्याच्या कार्याला सुरवात करावी लागेल असे सूतोवाच फोरम चे नॅशनल सेक्रेटरी श्री. रवींद्र अंबाडकर यांनी केले. फोरम नि जी उद्दिष्टे ठरवले होते त्यातील बरेच उद्दिष्ट गाठले आहे. नजीकच्या काळात समाजातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी बाजार हा महत्वाकांक्षी प्रकल्प फोरम लवकरच आणणार असून फोरम चे चेअरमन श्री. अविनाश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या प्रकल्पाचे काम सुरु आहे अशी माहिती श्री. रवींद्र अंबाडकर यांनी दिली. जे प्रेम आणि सहयोग समाजबांधवांकडून मिळत आहे त्या बद्दल समाजबांधवांचे आभार मानत समाजाने माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ च्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. अंबाडकर यांनी केले.