माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ मार्केटिंग प्लॅटफॉर्म :: “कल करे सो आज कर आज करे सो अब “
माळी उद्योजक फोरम केजेफॉसिआ मार्केटिंग प्लॅटफॉर्म ला अखेर सुरवात झालीच, ठरलेल्या वेळेत झाली. सुरवात करतांना नाही म्हंटलं तरी मनात थोडी अस्थिरता होतीच कारण समाजासाठी हे सगळं नवीन होत. तंत्रज्ञानाचा वापर करणं सगळ्यांना शक्य देखील नव्हतं परंतु आम्ही खूणगाठ बांधली होती सुरवात करायचीच कारण केव्हा ना केव्हा सुरवात करावीच लागणार आहे मग आजच का नाही आणि आणि सुरवात केल्या शिवाय समाजातील व्यापाऱ्यांना या तंत्रज्ञानाशी एकरूप कसे होता होईल. अजूनही बरेच काम करायचे आहे. तांत्रिक अडचणी मुळे पेमेंट गेटवे अजून मिळाला नाही. प्लॅटफॉर्म वर ई-शॉप सुरु झालेल्या व्यापाऱ्यांचे ट्रेनिंग प्रलंबित आहे पण हे देखील होईल. आमच्या दृष्टीने समाजहितासाठी या प्लॅटफॉर्म ची सुरवात होणे महत्वाचे होते.
मध्यंतरी वर्तमान पात्रात वाचले होते रिलायन्स इंडस्ट्री रिटेल इंडस्ट्री मध्ये ५०००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. जिओ मार्केट ची तर ऍमेझॉन मार्केट विकत घेण्याची तयारी सुरु आहे. केंद्र सरकारने जे नवीन कृषी विषयक धोरण आणले आहे त्यानुसार आता कोणत्याही परवाण्याविना कोणीही शेतकर्त्यांपासून सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार माल विकत घेऊन ग्राहकाला विकू शकतो यात कोणताही सेस लागणार नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग च्या कायद्यानुसार कोणताही व्यापारी शेतकऱ्यांसोबत करार करून त्याच्या शेतीत पाहिजे ते उत्पन्न घेऊ शकतो याचा अर्थं येणाऱ्या काळात या मोठ्या कंपन्यां शेतकऱ्यांकडून हमी भावात माल विकत घेतील आणि कोणताही सेस नसल्याने हा माल स्वस्त दारात ग्राहकांना उपलब्ध राहील. या करीता मोठ्या कंपन्यांनीं आपले मार्केटिंग जाळे बनवायला सुरवात देखील केली आहे. छोट्या शहरात या, तालुका स्तरावर, मोठ्या गावात येणाऱ्या काळात या मोठ्या कंपन्यांचे आउटलेट दिसले तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. त्यावेळी स्थानिक व्यापारी एखादी वस्तू १० रुपयात विकत असेल तर तीच वस्तू या कंपन्या ८ रुपयात विकतील. हीच परीस्थिती सेवा व्यवसायिकासोबत सुद्धा राहणार आहे कारण या कंपन्या सेवा व्यवसायमध्ये सुद्धा गुंतवणूक करीत आहेत. या गोष्टी घडायला काही काळ निश्चित लागणार आहे पण हे घडणार आहे एवढे मात्र निश्चित.
या सर्व धडाक्यात आपला व्यापारी टिकून राहाणे आवश्यक आहे. केजेफॉसिआ ने जी मार्केटिंग प्लॅटफॉर्म ची सुरवात केली त्यामुळे आज सर्व प्रकारचे उत्पादक,विक्रेते,सेवा व्यवसायी या माध्यमातून एका प्लॅटफॉर्म वर एकत्र यायला सुरवात झाली हे खूप महत्वाचे आहे. यातून येणाऱ्या काळात ग्रुप बिझनेस चॅनल तयार होईल आणि त्या माध्यमातून या मोठ्या कंपन्यांसोबत काम्पिटिशन मध्ये टिकता येईल. आजमितीला जवळपास ५०० चे आसपास प्रॉडक्ट मार्केटिंग प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहेत. रोज नवीन नवीन व्यावसायिक जुळत आहे त्यांच्या प्रॉडक्ट ची माहिती अपलोड करणे सुरूच आहे. अजून बरंच काही करायचे आहे , येत्या काळात जिल्हा वितरक नेमायचे आहेत त्याची प्रक्रिया सुरु आहे , तालुका स्तरावरील मार्केटिंग कमिशन एजन्ट नेमणे सुरु आहे.
आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे कि हे कार्य पाहिजे तेवढे सोपे सोपे नाही. कोणतीही नवीन कार्यप्रणाली समाजामध्ये रुजवायला फार त्रास होतो परंतु कष्ट करायची आमची तयारी आहे.
कोरोनाचा काळ सुरु असल्याने सध्या संवाद फक्त आणि फक्त सोशल मीडिया च्या माध्यमातूनच साधावा लागत आहे. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून व्यक्तिशः चर्चा करून हि संकल्पना रुजविणे हि प्रक्रिया अजून सुरु नाही झाली. फक्त सोशल मीडिया च्या माध्यमातून जो प्रतिसाद मिळतो आहे तो पाहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून जेव्हा या मार्केटिंग प्लॅटफॉर्म ची संकल्पना रुजविण्याचे कार्य टीम केजेफोसिआ सुरु करेल त्यावेळी मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असेल हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यवेत्याची आवश्यकता नाही. आम्ही देखील त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहोत. या संपूर्ण बाबींचे आकलन करता येणारा काळ हा सुवर्ण काळ राहील हा विश्वास आम्हाला आहे याला कारण समाजाकडून मिळणारा प्रतिसाद आहे हे या ठिकाणी विशेषत्वाने नमूद करणे आवश्यक आहे . आम्ही जेव्हा हा मार्केटिंग प्लॅटफॉर्म सुरु केला तेव्हा आम्हाला सुद्धा इतका चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. परंतु आता विश्वास वाटत आहे की माळी समाजासाठी मार्केटिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी माळी उद्योजक फोरम केजेफोसिआ ने जे पाऊल उचलले ते अतिशय योग्य होते.
एकवेळ पेमेंट गेटवे सुरु झाले कि खरेदी विक्रीला सुद्धा सुरवात होईल तोपर्यंत हि संकल्पना शेवटच्या व्यापाऱ्या पर्यंत रुजवणे हे सुरूच राहील.
आता हि अविरत चालत राहणारी प्रक्रिया आहे. यात नवीन नवीन बाबींचा समावेश होतच राहणार आहे . अडचणी या येताच राहणार आहे परंतु टीम केजेफोसिआ या सर्व अडचणींसह समाजाला आर्थिक उन्नतीच्या या मार्गावर घेऊन जाण्यास सज्ज आहे हे मात्र निश्चित. म्हणूनच म्हणतात वेळेवर झालेली सुरवात हि नेहमी अंतिम साध्यापर्यंत पोहोचवते .
जय जोती जय क्रांती
अविनाश ठाकरे
चेअरमन केजेफोसिआ
माळी उद्योजक फोरम